मराठा मावळा संघटनेच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे मराठा कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भेट
- dhadakkamgarunion0
- Oct 16
- 1 min read
मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची आज मराठा कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मराठा मावळा संघटनेचे मुंबईच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर केले व शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार युवक तसेच ऐतिहासिक वारशाच्या जतनाशी संबंधित महत्त्वाच्या मागण्या अभिजीत राणे यांच्या माध्यमातून मांडण्यात आल्या व चर्चा केली. मागण्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे हेक्टरी ₹५०,००० मदत निधी जाहीर करावा., शेतकऱ्यांची थकीत वीजबिलं माफ करावीत., शैक्षणिक फी माफी व कर्जमाफीची मागणी., मुंबईसह राज्यभर छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक उभारणीसाठी तत्काळ कार्यवाही., मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाची अंमलबजावणी., कृषी उत्पादन बाजार समित्यांत शेतकऱ्यांचा थेट सहभाग., मराठा समाजातील तरुणांसाठी उद्योगधंदा प्रोत्साहन योजना. आदी मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी सोबत मराठा मावळाचे मुंबई जिल्हा अध्यक्ष अमित सावंत व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
#MarathaMavlaSanghatana #AbhieetRane #MarathaReservation #Mumbai #SocialJustice #JaiShivray #MarathaUnity #AR















Comments