top of page

भारतातील सामाजिक न्यायाचा प्रवास

  • dhadakkamgarunion0
  • 3 hours ago
  • 2 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारतातील सामाजिक न्यायाचा प्रवास

पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये अन्नधान्य मिळवण्यासाठी लोकांना रांगा लावाव्या लागतात, ट्रक लुटले जातात. पण भारतात नरेंद्र मोदी सरकारने कोरोनाकाळापासून 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य दिले आहे. ही योजना केवळ उपजीविकेची हमी नाही तर सामाजिक स्थैर्याचीही खात्री आहे. दलित हिंदू किंवा नवबौद्धांना येथे शरिया कायद्याखाली पिचून टाकले जात नाही; उलट त्यांना आरक्षण, अट्रोसिटी कायद्याचे संरक्षण आणि समान नागरी अधिकार दिले आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये 370 रद्द झाल्यानंतर तिथले दलितही मान ताठ करून जगू लागले आहेत. भारतामध्ये अल्पसंख्यांकांना ठेचून मारणे, प्रार्थनास्थळे जाळणे असे अमानवी प्रकार होत नाहीत. उलट अल्पसंख्यांक मंत्रालयाद्वारे त्यांना विशेष सुविधा दिल्या जातात. त्यामुळे भारताचा प्रवास हा न्याय, समानता आणि सामाजिक संरक्षण यांचा आहे—जो शेजारी देशांच्या वास्तवाशी तीव्र विरोधाभास दाखवतो.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात  

अफवांना फाटा, निष्ठेला सलाम

अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हा सकाळपासून धनंजय मुंडे यांच्या नावाने अफवा पसरवणाऱ्यांना मोठा धक्का बसला. मुंडे साहेबांनी कुठेही मंत्रीपदाची मागणी केली नाही, उलट दादांबद्दल आदरानेच बोलले. काही पेड मीडिया आणि जातीयवादी ट्रोल्सनी त्यांना मुद्दाम व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मुंडे यांनी संयम राखून आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले. गोधडी योद्ध्यांचे तोंडसुख, पत्रकारांची फौज आणि अफवांचा बाजार अखेर भुस्कटातच गेला. मुंडे साहेबांचे रसायन अजूनही कुणालाच कळलेले नाही. अफवांवर जगणाऱ्यांना हा स्पष्ट संदेश आहे—धनंजय मुंडे यांना बदनाम करणे तुमच्या बसचे नाही. निष्ठा आणि संयम हेच त्यांचे खरे बळ आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

चक्रव्यूह उलटा पडला

देशात स्वतःला “चाणक्य” मानणारे अमित शाह यांचे राजकीय गणित आता उलटे पडले आहे. योगी आदित्यनाथ यांना कमजोर करण्यासाठी संत समाजाशी वाद, शंकराचार्यांचा अपमान आणि नंतर सवर्ण समाजावर प्रहार—या सगळ्या हालचाली नियोजित होत्या. धर्मेंद्र प्रधानमार्फत आलेल्या UGC निर्णयाने मात्र अपेक्षेपेक्षा मोठा बाउंस-बॅक दिला. सवर्ण समाज शांत बसला नाही आणि भाजपाला मोठा फटका बसला. योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टपणे सवर्ण समाजाच्या बाजूने उभे राहिले असते तर समीकरण बदलले असते. पण मौनाने त्यांनी स्वतःची ताकद कमी केली. सत्ता क्षणभंगुर आहे, समाज स्थायी आहे. सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे राहणे हाच आता मार्ग आहे. अन्यथा चक्रव्यूह रचणाऱ्यालाच त्यात अडकावे लागेल.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात

पडद्यामागचे खेळ आणि लोकशाही

महाराष्ट्राच्या राजकारणात आज दिसणारे चित्र हे सरंजामशाही, कुटुंबीय वर्चस्व, उद्योजक–राजकारणी नेक्सस आणि माध्यमांच्या प्रभावाचे मिश्रण आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांसारखे नेते निर्णायक क्षणी पुढे येतात, तर जनाधार असलेले कार्यकर्ते मागे पडतात. पक्ष आणि घर यातील सीमारेषा धूसर झाल्याने वारस ठरवण्याची लढाई अधिक गुंतागुंतीची होते. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत, ही संधी त्यांना कमी लेखणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. इतिहास सांगतो की स्त्रियांना सत्ता मिळाल्यावर त्यांनी अनपेक्षित चमत्कार घडवले आहेत. मात्र, हे राजकारण आता लोकांच्या हातातून निसटले आहे. संहिता लिहिणारे वेगळेच आहेत, आणि आपण पाहतो ते फक्त अभिनय आहे. लोकशाहीचा खरा मालक कोण, हा प्रश्न अधिकच गडद होत चालला आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

संवेदनशीलतेतून नेतृत्वाची दुसरी इनिंग

अजितदादांच्या निधनानंतर लगेचच राजकीय वारसदाराची चर्चा सुरू झाली. अनेकांना हे क्रूर वाटले, पण वास्तवात ही गरज होती. दादांनी उभं केलेल्या साम्राज्यावर गिधाडांची नजर पडू नये म्हणून तातडीने निर्णय घेणे आवश्यक ठरले. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत, ही केवळ अनुकंपा नाही तर त्यांच्या नेतृत्वगुणांना सिद्ध करण्याची संधी आहे. अहिल्यादेवी होळकरांनी पतीच्या मृत्यूनंतर साम्राज्य वाचवण्यासाठी उभं राहिलं, तशीच भूमिका आज सुनेत्रा वहिनींची आहे. दबाव निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचा सामना करताना त्यांनी दादांच्या तालमीत शिकलेले धडे वापरले पाहिजेत. महाराष्ट्राला संवेदनशील पण ठाम नेतृत्वाची गरज आहे. ही दुसरी इनिंग यशस्वी ठरावी, हीच खरी श्रद्धांजली दादांना ठरेल.

🔽







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page