भाजपाची महापालिका निवडणूक तयारी 'फास्ट ट्रॅक'वर; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सूत्रे हाती
- dhadakkamgarunion0
- 8 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
भाजपाची महापालिका निवडणूक तयारी 'फास्ट ट्रॅक'वर; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सूत्रे हाती
● राज्यातील बहुप्रतिक्षित महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः संपूर्ण रणनीतीची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. मुंबईतील 'विजय संकल्प' मेळाव्यात त्यांनी महायुतीचाच महापौर होणार, असा ठाम विश्वास व्यक्त केल्यानंतर, आता त्यांनी विविध विभागांमधील पक्षीय स्थितीचा आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी थेट बैठका सुरू केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक महापालिका क्षेत्राचा बारकाईने आढावा घेत आहेत. यामध्ये प्रभागनिहाय राजकीय परिस्थिती, संभाव्य उमेदवार आणि विरोधी पक्षांची ताकद विचारात घेऊन सूक्ष्म नियोजन केले जात आहे. या बैठकांमध्ये फडणवीस हे स्थानिक नेत्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत आणि त्याच ठिकाणी त्वरित उपाययोजना सुचवत आहेत.
©️ -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)
Comments