बंडखोर नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढू; मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका
- dhadakkamgarunion0
- Nov 19
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
बंडखोर नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढू; मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका
● राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या बंडखोरीवर चर्चा करून योग्य तो तोडगा काढू, असे महत्त्वाचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते म्हणाले की, स्थानिक पातळीवरील निवडणुकीत इच्छुकांनी बंडखोरी करणे स्वाभाविक आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असणे साहजिक आहे. आम्ही या बंडखोर नेत्यांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू. बंडखोरीमुळे पक्षाला होणारे नुकसान टाळण्यासाठी ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर नेत्यांशी वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. समन्वय साधून बंडखोरांना समजावून सांगणे आणि त्यांच्या अडचणींवर तोडगा काढणे, हाच अंतिम उद्देश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments