धडक कामगार युनियनच्या वतीने हार्मोनी येथील कार्यालया बाहेर गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग व छत्री वाटप
- dhadakkamgarunion0
- Jul 8
- 1 min read
🔹 धडक कामगार युनियन महासंघ आयोजित दक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून युनियनच्या गरजू पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मुलांना मोफत शालेय बॅग व छत्री वाटप कार्यक्रम धडक कामगार युनियनच्या हार्मोनी येथील कार्यालया बाहेर संपन्न झाला.
शालेय बॅग दक्ष नागरिक फाउंडेशन चे अध्यक्ष ऍड. सुनील कुमार यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या उपक्रमात संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नारायण पणीकर (मुरली), उपाध्यक्ष फरिद शेख, मुंबई अध्यक्ष कमलेश वैष्णव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.
"शिक्षणाचा प्रसार आणि मुलांच्या प्रगतीसाठी मदत करणे हीच खरी समाजसेवा आहे. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढेल." अशी प्रतिक्रिया धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना दिली.
#AbhijeetRane #धडककामगारयुनियन #SchoolKitDistribution #समाजकार्य #शालेयसाहित्यवाटप #धडकपरिवार #EducationForAll







Comments