खरा विद्यार्थी नेता आणि संकटाच्या वेळी पळ काढणारा भगोडा यातील स्पष्ट फरक...
- dhadakkamgarunion0
- 6 days ago
- 3 min read
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
खरा विद्यार्थी नेता आणि संकटाच्या वेळी पळ काढणारा भगोडा यातील स्पष्ट फरक आज संपूर्ण देश पाहत आहे. एकीकडे उपोषणाचे केवळ नाटक करून दुसऱ्याच दिवशी पळ काढणारा, तरुणांना ढाल बनवणारा आणि संसदेवरील आंदोलनाच्या गप्पा मारून ऐन वेळी बिळात लपणारा अभिजित दिपके व त्याची टोळी आहे; जो केवळ खोट्या प्रोपोगेंडा आणि सोशल मीडियाच्या अल्गोरिदमने लादलेला एक ढोंगी चेहरा आहे. तर दुसरीकडे, झारखंडचा ढाण्या वाघ देवेंद्र महतो आहे, जो कोणत्याही देशविरोधी घोषणा अथवा नक्षली अजेंड्याशिवाय सलग ९ दिवस उपाशी राहून आणि १७ दिवसांपासून ऊन-पावसाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर खंबीरपणे लढत आहे. जमिनीवर घाम गाळून सच्चा जनाधार निर्माण करणारा देवेंद्र महतो हाच राष्ट्रभक्त तरुणांचा खरा युवा नेता असून स्वतःची कातडी वाचवणारा दिपके हा निव्वळ एक भगोडा आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
अभिजित दिपके यांच्या दोन कोटींच्या शैक्षणिक खर्चावरून उठलेले वादंग पाहता, पालक कष्टाने किंवा मालमत्ता विकूनही मुलांचे शिक्षण पूर्ण करू शकतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मात्र खरी चिंता या खर्चाच्या व्यवहार्यतेची आहे. सामान्य कुटुंबात शिक्षणावर कोट्यवधींचा खर्च झाल्यावर मुलांचे पहिले कर्तव्य असते की, योग्य नोकरी मिळवून तो खर्च वेळेत भरून काढणे. राजकारण्यांच्या श्रीमंत मुलांप्रमाणे बिनधास्त राहणे सामान्य घरातील तरुणांना परवडणारे नसते. स्वतःचे व पालकांचे भविष्य सुरक्षित न करता थेट आंदोलने व राजकारणात उडी घेणे व्यावहारिक दृष्ट्या धोक्याचे ठरते. असामान्य किंवा क्रांतिकारी जगायच्या नादात सामान्य जगण्याचा भक्कम पाया गमावून चालणार नाही. त्यामुळे प्रत्येक तरुणाने आधी आर्थिक स्थैर्य मिळवून पालकांचा विश्वास सार्थ ठरवणे आणि मगच सामाजिक-राजकीय ध्येयांचा पाठपुरावा करणे हाच विवेकी मार्ग ठरेल.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
मराठी रंगभूमीवर स्व. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यानंतर प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत खेचून आणत अखंड 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड झळकवणारे महानायक म्हणजे प्रशांत दामले. त्यांनी आपल्या असामान्य अभिनयाच्या जोरावर जागतिक विक्रम रचत मराठी नाट्यरसिकांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त केले आहे. परंतु, सीजेपी पार्टीवर केलेल्या टीकेचा राग मनात धरून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामी यांनी ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्यावर अश्लाघ्य आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणे अत्यंत क्लेशदायक आहे. राजकीय किंवा वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु त्यासाठी कलेच्या क्षेत्रातील इतक्या मोठ्या दिग्गजाचा आणि त्यांच्या योगदानाचा अनादर करणे विकृती दर्शवते. कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवणाऱ्यांनी वैचारिक विरोधापोटी पातळी सोडून चिखलफेक करणे योग्य नाही. विचारसरणी कोणतीही असो, रंगभूमीची सेवा करणाऱ्या अत्यंत श्रेष्ठ कलाकाराचा सन्मान राखणे हीच महाराष्ट्राची खरी सांस्कृतिक परंपरा आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
पुर्वाश्रमीचे भाजपाचे नसलेले गोपीचंद पडळकर, नितेश राणे, महेश लांडगे आणि आता अक्षय कर्डीले यांच्याकडूनच कट्टर हिंदुत्ववादी भुमिका बघायला मिळत आहेत. परंतु त्याच वेळी संपूर्ण आयुष्य संघ आणि भाजपात घालवलेले आमचे नेते सबका साथ सबका विश्वास यात गुरफटून आपला कट्टर हिंदुत्ववादी मतदार दुरावतांना कसे काय पाहु शकतात हा प्रश्न मतदारांसोबतच माझ्यासारख्या कट्टर कार्यकर्त्याला देखील वारंवार पडत असतो. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे जाहीर सभेत मुस्लिमांचा अपमानास्पद उल्लेख करून कट्टर हिंदुत्वाचे आयकॅान झाले. त्यांची ही भुमिका त्यांच्या वारसांनी सोयीस्कररित्या झटकून टाकल्यानंतर ती पोकळी हे आयात नेते भरून काढतांना दिसत आहेत.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात*
वाढते प्रदूषण, गोंगाट आणि वाहतुकीचा ताण यामुळे ट्रॅफिक पोलिसांमध्ये वाढणारे वैफल्य हा चिंतेचा विषय असला, तरी त्यांचे अयोग्य वर्तन समर्थनीय ठरू शकत नाही. हँडहेल्ड मशीनमुळे चिरीमिरीची कमाई घटल्याने आणि कामाचा ताण वाढल्याने पोलिसांचा संयम सुटत चालला आहे. पुण्यात सिंहगड रोडसारख्या भागात वाहनचालकांना मिळणारी तुच्छतादर्शक वागणूक आणि महिला पोलिसांची असंस्कृत भाषा पोलीस दलाच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. शिस्त आणि आदर निर्माण करण्याऐवजी पोलीस स्वतःच आपली पत गमावत आहेत. त्यातच ओळख लपवण्यासाठी छातीवरील नेमप्लेट पाकीट कव्हरने झाकून ठेवण्याची हुशारी सर्रास पाहायला मिळते. जनतेत शिस्त नसणे ही एक बाजू असली, तरी खाकी वर्दीतील कर्मचाऱ्यांनी मर्यादा ओलांडून अरेरावी करणे चुकीचे आहे. प्रशासनाने या वाढत्या उद्दामपणाची तात्काळ दखल घेऊन पोलिसांचे समुपदेशन करणे आणि शिस्तभंगावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
🔽









Comments