top of page

उष्णतेची लाट आहे. फ्रान्समध्ये २५ जूनपासून जवळपास १,००० लोकांचा मृत्यू झाला...

  • dhadakkamgarunion0
  • 2 days ago
  • 3 min read

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

युरोपमध्ये सध्या भीषण उष्णतेची लाट आहे. फ्रान्समध्ये २५ जूनपासून जवळपास १,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. रस्ते वितळत आहेत, ट्रॅफिक सिग्नल निकामी होत आहेत, रेल्वेचे रूळ वाकत आहेत. जर्मनीमध्ये लोकांना गारवा मिळावा म्हणून पाण्याचे फवारे मारणाऱ्या गाड्या फिरत आहेत. नागरिक नदी, तलाव, कॅनॉलमध्ये तासन्‌तास बसून उन्हापासून बचाव करत आहेत. एसी-पंख्यांसाठी इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये इतकी गर्दी आहे की काही तासांतच स्टॉक संपतो. प्रगत तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा असूनही निसर्गाच्या एका उष्णतेच्या लाटेसमोर युरोप हतबल झाला आहे. ही केवळ Heatwave नाही, तर Climate Change चा लाल इशारा आहे. निसर्गाला हरवण्याचा प्रयत्न करणारा माणूस आज निसर्गापुढेच पराभूत झाला आहे. महाराष्ट्रात सुद्धा सध्या विकास वेडा झाला आहे. युरोप जात्यात आहे महाराष्ट्र सुपात आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

जगात पेट्रोल पंप राहतील पण त्यावर पेट्रोल नसेल, तर हायड्रोजन असेल! हा अदृश्य वायू भविष्यातील ऊर्जा अर्थव्यवस्थेचा पाया ठरू शकतो. वीज साठवण महाग असताना हायड्रोजन दाबाखालील टाक्यांत, द्रवरूपात किंवा धातूंमध्ये सुरक्षित ठेवता येतो. त्यामुळे अतिरिक्त सौर व अणुऊर्जा भविष्यासाठी जपता येईल. ज्वालाग्राही असल्याने सुरक्षा महत्त्वाची आहे, म्हणून कार्बन फायबर टाक्या, सेन्सर व झडपा विकसित होत आहेत. पोलाद, सिमेंट, खत उद्योगात हायड्रोजन वापरल्यास प्रदूषणात मोठी घट होईल. ट्रक, बसेस, जहाजं, रेल्वे आणि विमानवाहतूकही हायड्रोजनवर चालू शकतात. भारताकडे सूर्यप्रकाश, वारा व अणुऊर्जा क्षमता असल्याने स्वस्त, स्वच्छ हायड्रोजन निर्मितीची संधी आहे. नुकत्याच भारताने अणुभट्टीतून थेट हायड्रोजन निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. भविष्यात तेल नव्हे, तर स्वच्छ हायड्रोजनच सर्वात मौल्यवान ठरेल.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

संजय राऊतच्या सततच्या वादग्रस्त विधानांमुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर मलिन झाली आहे. गेल्या काही वर्षांत राऊतने वापरलेली अश्लाघ्य भाषा कार्यकर्त्यांना आणि जनतेला दूर लोटणारी ठरली. राज ठाकरेंनी निवडणुकीत शांतता राखली होती, पण नंतर राऊत पुन्हा आक्रमक झाला. “शिंदे-मिंधे”, “पन्नास खोके” अशा टोमण्यांनी पक्षाला फायदा झाला नाही, उलट नुकसानच झाले. संपादक असूनही राऊतने वापरलेली असभ्य भाषा पक्षाच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. सुषमा अंधारे यांच्यासारख्या नेत्यांच्या तोंडळपणामुळेही पक्षाची प्रतिमा खालावली आहे. उद्धव ठाकरेंनी हे ओळखूनही राऊतला वेसण घातली नाही. बहुदा गाढवाला वेसण घालण्याचा प्रघात नाही, म्हणूनच पक्षाचे तीन तेरा वाजले आहेत. ठाकरेंचे भविष्य अशा नेतृत्वामुळे धोक्यात आले आहे.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

तुकाराम मुंढे यांचं कामकाज हे प्रामाणिकपणाचं प्रतीक आहे. भ्रष्टाचारावर बोलणारे अनेक असले तरी त्याच्या मुळावर घाव घालणारा अधिकारी आला की विरोध सुरू होतो. कारण प्रामाणिक अधिकारी हा सामान्यांसाठी हिरो असतो, पण बेईमानीवर चालणाऱ्या व्यवस्थेसाठी तोच सर्वात मोठा शत्रू ठरतो. मुंढे यांनी कुठेही काम केलं तरी त्यांची चर्चा खुर्चीमुळे नाही, तर कामामुळे झाली. सततच्या बदल्यांनंतरही त्यांची भूमिका कायम राहिली—नियम सगळ्यांसाठी सारखे, सरकारी पैसा जनतेचा आणि प्रशासन लोकांच्या सेवेसाठी. समाजात अशा अधिकाऱ्यांना विरोध होतो कारण त्यांना फक्त फाईलशी नव्हे तर लोकांच्या सवयींशी लढावं लागतं. तरीही दबावापुढे न झुकण्याची त्यांची वृत्ती प्रेरणादायी आहे. इतिहासात व्यवस्था जनतेसाठी वापरणारेच लक्षात राहतात, आणि मुंढे यांचं नाव त्या यादीत ठळकपणे लिहिलं जातं.

🔽

🖋️ *अभिजीत राणे लिहितात*

मुहर्रमच्या भायखळा मिरवणुकीत मोठा कट उघडकीस आला. हजारो शिया बांधव मातम करत असताना फैय्याज नावाचा व्यक्ती पेनकिलरच्या नावाखाली कॅप्सूल वाटत होता. एका व्यक्तीने घेतल्यावर तब्येत बिघडली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. फैय्याजकडे तब्बल १४,९०० कॅप्सूल सापडले ज्यात उंदीर मारायचे घातक रसायन जिंक फॉस्फाईड भरलेले होते. त्याच्या घरातूनही ५० किलो विषारी पदार्थ मिळाला. पोलिसांच्या मते त्याचा उद्देश सुमारे ३०,००० शिया बांधवांचा जीव घेण्याचा होता. सुरुवातीला लोकांना वाटले की तो बाहेरील एजंट आहे, पण तो स्वतः मुस्लिम निघाला. शिया बांधवांच्या शांततापूर्ण जुलूसाला लक्ष्य करण्यामागचे कारण अजूनही तपासात स्पष्ट झालेले नाही. या घटनेने शिया-सुन्नी यांच्यातील परस्पर संघर्ष भारतात इतका विकोपाला जाऊ शकतो याची कोणीच कल्पना सुद्धा केली नव्हती.

🔽


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page