‘उबाठा’ची हिंदुत्व विरोधी भूमिका; अमित साटम यांनी साधला थेट निशाणा
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
‘उबाठा’ची हिंदुत्व विरोधी भूमिका; अमित साटम यांनी साधला थेट निशाणा
● भाजपा नेते आणि आमदार अमित साटम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी थेट उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना घेरले असून, केवळ मतांच्या राजकारणाकरिता हा गट हिंदुत्व विरोधी भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. आर. स्वामिनाथन यांच्याविरुद्ध 'इंडी' आघाडीतील खासदारांनी आणलेल्या हक्कभंग नोटिसीवर उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सही केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. या कृतीमुळे उबाठा गट हिंदुत्वापासून दूर जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अमित साटम यांनी केलेल्या थेट आरोपामुळे उद्धव ठाकरे गटावर दबाव वाढला आहे. "उबाठा गट आता स्वतःला 'सेक्युलर' म्हणवून घेण्यासाठी सज्ज झाला आहे," असा टोलाही साटम यांनी लगावला आहे. आमदार अमित साटम यांनी आपल्या ट्विटर संदेशात, ‘मतांच्या राजकारणासाठी उबाठा गट हिंदुत्व विरोधी भूमिका घेतोय,’ असे स्पष्टपणे म्हटले आहे. साटम यांच्या म्हणण्यानुसार, ही कृती म्हणजे उबाठा गटाने हिंदुत्वाची विचारसरणी सोडून दिल्याचेच द्योतक आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments