top of page

‘उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरू देणार नाही’;मुख्यमंत्री फडणवीसांची मिश्किल टिप्पणी

  • dhadakkamgarunion0
  • 22 minutes ago
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

‘उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरू देणार नाही’;मुख्यमंत्री फडणवीसांची मिश्किल टिप्पणी

● उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या हंबरडा मोर्चाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, 'मोर्चा काढणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे.' तसेच, शेतकऱ्यांच्या अडचणींसाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरत आहेत, याचा अर्थ शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळणार यावर त्यांचा विश्वास आहे. मदत मिळाली नाही तर रस्त्यावर उतरणार असतील तर आम्ही त्यांना रस्त्यावर उतरू देणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी फडणवीस यांनी केली. एकंदरीत, विरोधी पक्षाने केलेल्या मागणीला सरकार सकारात्मक दृष्टिकोन ठेवत असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे दर्शवले. फडणवीस यांनी म्हटले की, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने निधीचा पहिला टप्पा वितरित करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतरही ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारने एकूण एकतीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून, त्यातील एकवीस हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत मागील सरकारच्या मदतीपेक्षा जास्त आहे. याशिवाय राज्य आणि केंद्र सरकारचे प्रत्येकी सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये देखील शेतकऱ्यांना मिळत आहेत, तसेच विमा कंपन्यांकडूनही पैसे देण्यात येत आहेत.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page