आरे वाचवा, लँड माफियांना थांबवा!— किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईची मागणी
- dhadakkamgarunion0
- Jul 6
- 1 min read
आरे वाचवा, लँड माफियांना थांबवामा. खासदार किरीट जी सोमय्या यांनी आरेमधील अतिक्रमण, मलबा टाकणे आणि अनधिकृत स्टुडिओ बांधकामांचा मुद्दा ठामपणे मांडला असून मुंबई भाजपा उपाध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यावेळी आरेतील रॉयल पाम व विविध ठिकाणी असलेल्या बेकायदेशीर माती भराव व आदींची माहिती दिली.किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात या पाहणी दौऱ्यात वन विभाग, महापालिका, आरे प्रशासन, पोलीस, इको सेन्सिटिव्ह झोन कमिटी, जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकारी तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा, माजी नगरसेविका प्रीती सातम तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.आरेची जमीन बळकावण्याचा गंभीर कट उघड झाला असून संबंधित अधिकाऱ्यांकडे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
#KiritSomaiya #DevendraFadnavis #mybmc #aarey #aareycolony




















Comments