लोकसभा अध्यक्षांवर काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना ...
- dhadakkamgarunion0
- 2 hours ago
- 3 min read





🖋️ अभिजीत राणे लिहितात
लोकसभा अध्यक्षांवर काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह काँग्रेसला आणि खास करून राहुल गांधीला विस्तृत अधिकृत माहिती सभागृहापुढे सादर करून फाडून खात आहेत आणि राहुल गांधी तोंड पाडून बसला आहे.काँग्रेसचा जो आरोप आहे की विपक्षांना बोलू दिले जात नाही त्यावर तर अमित शहा यांनी इतकी साद्यंत माहिती दिली आणि ती उदाहरणे दिली ज्यातून हे स्पष्ट दिसत होते की रड्या राहुल गांधी ची सभागृहातील हजेरी सदनाच्या सभासदांच्या सरासरी हजेरीपेक्षा बरीच कमी होती आणि अनेक वेळा महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा होणार असल्याची पूर्वसूचना असून सुद्धा गैर हजर राहणे,सभेच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करणे आणि मग आरोप करणे की आम्हाला बोलू दिले जात नाही या सारखे वागणे हे विपक्ष नेता या पदाला अजिबात शोभा देणारे नाही. या पूर्वी ज्या प्रमाणे विपक्षाला चर्चेत प्रत्येकवेळी मार खावा लागला त्याचीच पुनरावृत्ती आज ही होताना दिसत आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
हरियाणा महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी सुचित्रा देवी यांनी राजीनामा दिल्यानंतर तेरा दिवसांनी मिरर नाऊ चॅनेलवर मोठा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी आणि त्यांच्या पती गौरव यांनी काँग्रेस हाय कमांड म्हणजे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना सात कोटी रुपये लाच दिली आहे. या खुलाशामुळे काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. मिरर नाऊवर यावर सध्या चर्चा सुरू असून राजकीय वर्तुळात याची मोठी दखल घेतली जात आहे. या आरोपामुळे काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्यांना रस असेल त्यांनी ताबडतोब हा रिपोर्ट पाहावा, कारण हा मुद्दा पक्षाच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर थेट परिणाम करणारा आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की, आता युनिफॉर्म सिव्हिल कोड (UCC) लागू करण्याची वेळ आली आहे. वेगवेगळ्या धर्मांचे वेगवेगळे कायदे ठेवून महिलांवर अन्याय करणे थांबले पाहिजे. मुस्लिम पर्सनल लॉमधील हलाला, बहुपत्नीत्वाची परवानगी, संपत्तीतील असमानता या तरतुदी महिलांना दुय्यम ठरवतात. कोर्टाने सांगितले की, या धारांना रद्द करणे संसद व सरकारचे काम आहे. जर सरकारने UCC लागू केला नाही तर महिलांचे अधिकार पुन्हा बळी जातील आणि हे फक्त मतांच्या राजकारणासाठी होईल. धर्म धोक्यात आहे असे काहीजण ओरडतील, पण खरी धोक्यात आहे ती समानता आणि न्याय. आता सरकारने धैर्य दाखवून UCC लागू करणे गरजेचे आहे, अन्यथा पुढची पन्नास वर्षे हा ढोंगच चालू राहील.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
इराण-अमेरिका संघर्षात तेल हा मुख्य मुद्दा ठरला आहे. ट्रम्पने इराणच्या तेल निर्मिती केंद्रांवर हल्ले न करण्याचा आदेश दिला, कारण अमेरिकेला इराणचे तेल हवे आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरील इराणचे नियंत्रण अमेरिकेला व इस्त्राईलला गुदमरवणारे ठरले आहे. इराणने हुशारीने व सातत्याने हल्ले करत अमेरिकेच्या महागड्या क्षेपणास्त्रांना निष्प्रभ केले. त्यांच्या स्वस्त शस्त्रास्त्रांनी अमेरिकेच्या दीडशे सैनिकांना गंभीर इजा पोहोचली आहे. इराणच्या नागरिकांचा सूड घेण्याचा निर्धार त्यांच्या लष्कराला माघार घेऊ देत नाही. युद्धाची सुरुवात कुणी केली हे जग विसरणार नाही. इराण तालिबानींसारखे छुपे हल्ले न करता समोरासमोर लढत आहे. त्यामुळे हे युद्ध केवळ सामरिक नाही तर तेलाच्या राजकारणाचे उघड दर्शन आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
देशांतर्गत गॅसच्या तुटवड्याला सरकारला दोष देणे योग्य नाही. युद्धस्थितीमुळे घरगुती गॅसच्या किमती वाढल्या आहेत आणि सोशल मीडियावर रणकंदन सुरू आहे. जीएसटीच्या माध्यमातून सरकार कोट्यवधींचा कर गोळा करत असताना सर्वसामान्यांना दिलासा देणे अपेक्षित होते. कमर्शियल गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहे. पुणेकरांना मात्र चुलीवरचे मटण खायची संधी मिळाली आहे. या संकटातून शिकण्यासारखे म्हणजे कुणालाही कमजोर समजणे चुकीचे ठरते. आत्मसन्मान जपत युक्तीने लढणे हे शिवछत्रपतींनी शिकवलेले आहे. इस्त्राईलचे प्रगत राष्ट्र असूनही त्यांची युद्धखुमखुमी त्यांना खड्ड्यात घालू शकते. ट्रम्पच्या अहंकारामुळे वाढलेले हे युद्ध जगभर झळ पोहोचवत आहे. त्यामुळे रशिया, चीन, भारत, ब्रिटन, फ्रान्स व आखाती राष्ट्रांनी तातडीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
🔽



Comments