top of page

आरएसएसवर बंदी घालण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे थेट प्रत्युत्तर

  • dhadakkamgarunion0
  • Oct 15
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

आरएसएसवर बंदी घालण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे थेट प्रत्युत्तर

● कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यांवर सरकारी जागांमध्ये बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी खरगे यांच्या मागणीला केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशभक्त आणि सांस्कृतिक संघटन आहे, असे ठामपणे सांगितले आहे. अशाप्रकारच्या क्षुल्लक गोष्टींकडे सरकार लक्ष देत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. फडणवीस यांनी सांगितले की, प्रियांक खरगे यांना स्वतःचे कोणतेही राजकीय महत्त्व नाही आणि त्यांचे राजकारण त्यांच्या वडिलांवर अवलंबून आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारचे पत्र मुख्यमंत्र्यांना देतात, याकडे आम्ही अजिबात लक्ष देत नाही. संघ हे राष्ट्रीय विचारांनी प्रेरित झालेले आणि देशभक्तीची भावना असलेले सांस्कृतिक संघटन आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे मूल्यांवर आधारित मानवनिर्मितीचे कार्य करणारे संघटन आहे. या संघटनेने नेहमीच राष्ट्रवादाचे महत्त्व शिकवले आहे, असेही फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page