आमचे लक्ष्य केवळ मुंबईचा विकास; अमित साटम यांनी स्पष्ट केली भूमिका
- dhadakkamgarunion0
- Jan 21
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
आमचे लक्ष्य केवळ मुंबईचा विकास; अमित साटम यांनी स्पष्ट केली भूमिका
● मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘मुंबईत महापौर महायुतीचाच होईल आणि आम्ही कोणत्याही विशिष्ट पदासाठी आग्रही नाही,’ असे साटम यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या हितासाठी महायुती कटिबद्ध असून वैयक्तिक पदापेक्षा शहराचा विकास आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अमित साटम यांनी आपल्या निवेदनात प्रशासकीय पारदर्शकतेवर अधिक भर दिला आहे. मुंबई महानगरपालिकेतून भ्रष्टाचार समूळ नष्ट करून मुंबईकरांना एक स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासन देणे हे महायुतीचे मुख्य उद्दिष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेवर असलेल्या ठराविक वर्चस्वाला छेद देऊन सामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा संकल्प साटम यांनी बोलून दाखवला आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच मुंबईची सुरक्षितता अबाधित राखणे हे आमचे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे ते म्हणाले आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments