top of page

'आपले सरकार' आता व्हॉट्सॲपवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

  • dhadakkamgarunion0
  • Sep 5
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

'आपले सरकार' आता व्हॉट्सॲपवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

● राज्य सरकारच्या विविध विभागांकडून नागरिकांना 'आपले सरकार' या पोर्टलच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच या सर्व सेवा योग्यप्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्यादृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये एक रिंग तयार करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या एकाच प्रकारच्या ९ सेवा एकत्र करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले, सेवा पुरवठ्याच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत नियमितपणे पडताळणी करण्यात यावी. तसेच अर्ज प्रक्रियेत लागणारी कागदपत्रांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी नियोजन करावे. सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसमान असावेत, जेणेकरून राज्यभरातील नागरिकांना एकसंध अनुभव मिळेल. या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिंग आणि क्लस्टर प्रणाली राबवण्यात यावी. रिंगमध्ये सुरवातीस त्या तालुक्यातील १० ते १२ गावांचा समावेश असावा आणि गरजेनुसार सेवा पुरवण्यात याव्यात. या रिंगच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र गट आणि व्यवस्थापन टीम तयार करावी.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page