आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सेवाभावी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बोस फाउंडेशन, महिला शिक्षा कल्याणकारी संस्था आणि कुरार पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावून आयोजकांचे कौतुक केले व अशा समाजहिताच्या उपक्रमांना नेहमीच आपला पाठिंबा राहील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमात गरजू व वंचित विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच माननीय ले. कर्नल डी. डी. गोयल, कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील, कुरार पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, श्री. अजय दुबे, श्री. मेहुल विटलानी, पवनजी, अॅड. चंद्रप्रकाश यादव, अंजूजी तसेच विविध योग समूहांचे सदस्य यांचीही उपस्थिती लाभली.
योग, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सर्व आयोजक आणि सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#AbhijeetRane #DhadakKamgarUnion #BJPKamgarAghadi #InternationalYogaDay #YogaForHealth #BoseFoundation #KurarPolice #SocialService #RaincoatDistribution #Mumbai #LiveMumbaiMitra






















Comments