अशोक खरात प्रकरणाला नवे वळण मिळाले असून ‘शिजूका नॉडी’ नावाच्या रहस्यमयी कॉल्समुळे तपास
- dhadakkamgarunion0
- 7 days ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अशोक खरात प्रकरणाला नवे वळण मिळाले असून ‘शिजूका नॉडी’ नावाच्या रहस्यमयी कॉल्समुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. १८ मार्चला अटक झालेल्या खरातवर महिलांची फसवणूक व शोषणाचे गंभीर आरोप आहेत. कोठडीत असताना त्याने स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दावा केला की खरातनेच ‘शिजूका नॉडी’ नावाने लोकांना फसवले आणि या प्रकरणात बड्या व्यक्तींचा हात असू शकतो. त्यांनी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या १७७ कॉल्सवर प्रश्न उपस्थित केला आणि चौकशीची मागणी केली. दमानिया यांनी स्पष्ट केले की खरातचा जीव धोक्यात आहे आणि सत्य लपवण्यासाठी त्याचा अंत होऊ शकतो, म्हणून तातडीने पोलीस संरक्षण द्यावे. या स्पष्टीकरणामुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नितीशकुमार यांच्या राजकीय लवचिकतेने, संयमाने आणि प्रसंगी केलेल्या त्यागाने BJP ने त्यांची कारकीर्द कोणतीही कटुता न निर्माण करता संपवली आणि त्यांचे केंद्रात योग्य व सन्मानपूर्वक पुनर्वसन केले. महाराष्ट्रातील स्थानिक पक्ष मात्र अजूनही चाचपडत आहेत आणि भाजपवर टीका करत आहेत. देवेगौडा आणि गुजराल पंतप्रधान झाले, पण महाराष्ट्राची पाटी अजूनही कोरी आहे. इथले खासदार दिल्लीत दुर्लक्षित राहतात, तर नितीशकुमार केंद्रात मोठ्या पदावर पोहोचतील. महाराष्ट्रातील तथाकथित चाणक्य मात्र आशाळभूतपणे बघत बसतील. संगत आणि कर्म यांचा हिशोब दैवाने कधीच चुकत नाही—नितीशकुमार संसदेत ताठ मानेने खासदार म्हणून जातील, तर महाराष्ट्रातील भावी पंतप्रधान भाजपाच्या दयेवर राज्यसभेत पोहोचतील. हा फरक महाराष्ट्राच्या राजकारणातील मर्यादा आणि बिहारच्या राजकीय वास्तवाचे स्पष्ट दर्शन घडवतो.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नाशिकच्या कार्पोरेट जिहाद प्रकरणातील संबंधित कंपनीने पत्रकार परिषद न घेता मौन बाळगल्याने अनेक गंभीर प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. सीसीटीव्ही होते का, त्याची जबाबदारी कोणाची होती, एचआर किंवा टीम लीडरवर देखरेख कोण करत होते ? हे अजूनही स्पष्ट नाही. नाशिक ब्रँच भाड्याने दिली होती का, गेल्या चार वर्षांत किती मुली अचानक काम सोडून गेल्या, त्यांची कारणं शोधली का? यावरही कंपनी गप्प आहे. रिक्रूटमेंटमध्ये विशिष्ट धर्माचे ४० लोक अचानक घेतले गेले, बीफ पार्टी, नमाज पठण, युनिफॉर्म न घालणे यासारख्या गोष्टी चालत होत्या, तरीही वरिष्ठांना काहीच माहिती नव्हती का? पोलिसांनी आरोपी पकडल्यानंतर चार दिवसांनी कंपनीने प्रतिक्रिया दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्लेसमेंटमधून आलेल्या मुलींना काम करायचे नसेल तर त्या का सोडून गेल्या याची चौकशी सुद्धा कंपनीने केल्याचे दिसून येत नाही. थोडक्यात त्या कर्मचार्यांच्या इतकाच कंपनीचा सुद्धा दोष आहे आणि त्यांना सुद्धा शिक्षा आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अशोक खरात प्रकरणावर तब्बल २८ दिवस मौन बाळगून अखेर रुपाली चाकणकर यांनी ठोस भूमिका स्पष्ट केली. सतत आरोप होत असतानाही त्यांनी संयम दाखवला, मात्र आता त्यांनी सर्व आरोपांना सडेतोड उत्तर दिले. “माझ्यावर लावलेले आरोप निराधार आहेत, कोणतेही ठोस पुरावे नाहीत,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. बदनामीसाठी आरोप केले जात आहेत, असा त्यांचा ठाम दावा आहे. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी ठामपणे नाकारले. सत्यस्थिती तपासूनच विधाने करावीत, अशी मागणी त्यांनी केली. क्षणभर रूपाली ताई पूर्ण निष्पाप आहे असे आपण समजले तरीही त्यांनी केलेल्या 177 कॉल्स चे काय ? खरात यांच्यावरील आरोप करणार्या पत्रकाराला त्यांनी महिला आयोगाच्या माध्यमातून धमकावले त्याचे काय ? आणि सगळ्यात महत्वाचे जर त्या खरच निर्दोष आहेत तर चौकशी पासून पळ का काढत आहेत ??
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सुप्रीम कोर्टाने काल ममता बॅनर्जींच्या ‘व्होट बँक राजकारणा’ला मोठा धक्का दिला. बनावट मतदारांवर कोणताही दिलासा नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने निष्पक्ष निवडणुकीचे संकेत दिले. टीएमसीने ३४ लाख नावं कोर्टात नेली होती, पण प्रश्न राहतो—हे खरे मतदार की राजकीय गणित? लोकशाहीत मतदानाचा हक्क आवश्यक आहे, मात्र बाहेरून आलेल्या मतदारांना अधिकार देणे देशाच्या सुरक्षेला धोका ठरतो, असे न्यायालयाने म्हटले. मागील निवडणुकांतील गुंडगिरी, मतदारांना घरात कोंडून ठेवणे, धमक्या देणे यामुळे वातावरण दूषित झाले होते. आता मात्र भाजपची ताकद असलेल्या भागांत गुंडगिरी कमी झाल्याचे दिसते. भ्रष्टाचार आणि पोलिसांची पक्षपाती भूमिका अजूनही प्रश्न आहेत. जर निवडणूक आयोग व केंद्रीय सुरक्षा दलांनी निर्भय वातावरण निर्माण केले तर बंगालमध्ये खऱ्या अर्थाने बदल घडू शकतो.
🔽
#AshokKharatCase #ShijukaNodiMystery #AnjaliDamania #NitishKumar #RupaliChakankar #BJPStrategy #NashikCase #CorporateAccountability #Accountability #PublicFigures #TruthAndJustice #MediaQuestions








Comments