अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजपाचा मुंबईतील विजयाचा संकल्प
- dhadakkamgarunion0
- 15 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजपाचा मुंबईतील विजयाचा संकल्प
● मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्याच्या उद्देशाने पक्षाने 'मिशन मुंबई' हे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी, पक्षाचे मुंबई अध्यक्ष, आमदार अमित साटम यांच्याकडे निवडणुकीच्या संपूर्ण संचालन समितीची कमान सोपवण्यात आली आहे. साटम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी आणि शक्तिशाली फौज निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज झाली आहे. अमित साटम हे भाजपाचे एक आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे ते सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. मुंबईतील नागरी समस्यांची त्यांना चांगली जाण आहे आणि त्यांनी वेळोवेळी सभागृहात तसेच विविध व्यासपीठांवर पक्षाची बाजू ठामपणे मांडली आहे. भाजपा नेतृत्वाने त्यांची ही कार्यक्षमतेची लक्षात घेऊनच साटम यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा' या मोहिमेतून भाजपाने मुंबईकरांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अमित साटम यांच्या नेतृत्वाखालील शिलेदारांची फौज आता भाजपाचा विजयाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी कामाला लागली आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments