अमित साटम यांचे ठाकरे गटाला प्रत्युत्तर
- dhadakkamgarunion0
- 5 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
अमित साटम यांचे ठाकरे गटाला प्रत्युत्तर
● मुंबईच्या महापौरपदासाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा दावा केला होता. मात्र, भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, विरोधकांनी नियमांचा नीट अभ्यास करावा, असा सल्ला दिला आहे. भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. साटम म्हणाले की, "आरक्षणाची प्रक्रिया ही कोणत्याही राजकीय दबावाखाली होत नाही. ज्यांना नियम माहित नाहीत, त्यांनी आधी कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करावा. अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी ठराविक नगरसेवकांची संख्या असणे आवश्यक असते, जी सध्याच्या परिस्थितीत बसत नाही." त्यांनी पुढे स्पष्ट केले की, विनाकारण संभ्रम निर्माण करणे हा ठाकरे गटाचा जुना स्वभाव आहे. नगरविकास विभागाने स्पष्ट केल्यानुसार, राज्यातील २९ महापालिकांच्या आरक्षणाची सोडत ही चक्रीय पद्धतीने काढली जाते. जर मागील काळात एखादा प्रवर्ग वगळला गेला असेल, तर त्याला पुढील वेळी प्राधान्य मिळते. अमित साटम म्हणाले, ही पूर्णपणे तांत्रिक प्रक्रिया असून त्यात हस्तक्षेपाला जागा नाही.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments