अमित साटम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थेट इशारा
- dhadakkamgarunion0
- 2 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
अमित साटम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थेट इशारा
● भाजपाचे मुंबई शहराध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जर नवाब मलिक यांना निवडणुकीच्या नेतृत्वाची धुरा सोपवली, तर भाजपा राष्ट्रवादीसोबत कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही, असा थेट इशारा साटम यांनी दिला आहे. अमित साटम यांनी घेतलेली भूमिका ही केवळ राजकीय विरोध दर्शवणारी नाही, तर ती भाजपाच्या पक्ष हितासाठी अत्यंत गरजेची आहे. नवाब मलिक यांच्यावरील आरोप आणि संबंधित न्यायालयीन प्रकरणांमुळे त्यांची प्रतिमा वादग्रस्त ठरली आहे. अशा व्यक्तीचे नेतृत्व स्वीकारून महापालिका निवडणूक लढवणे हे पक्षाच्या स्वच्छ प्रतिमेसाठी योग्य नाही, अशी भाजपाची धारणा आहे. साटम यांच्या या भूमिकेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही स्पष्ट संदेश गेला आहे. मलिक यांच्या नेतृत्वावर उघडपणे आक्षेप नोंदवत अमित साटम यांनी थेट इशाराच दिलेला आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments