अमित साटम दत्तक वस्ती योजनेतील घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंना घेरणार
- dhadakkamgarunion0
- Dec 12, 2025
- 1 min read
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ]
▪️==================▪️
अमित साटम दत्तक वस्ती योजनेतील घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंना घेरणार
● मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी 'दत्तक वस्ती' योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनियमितता होत असल्याच्या गंभीर आरोपांवर अखेर राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचे संपूर्ण लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा जोरदारपणे मांडला. योजनेत निकषांचे उल्लंघन आणि निधीचा गैरवापर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मुंबई महानगरपालिकेवर दीर्घकाळ शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे साटम यांनी उघडकीस आणलेल्या या घोटाळ्यामुळे महापालिकेच्या तत्कालीन प्रशासनावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या लेखापरीक्षणानंतर जो अहवाल समोर येईल, त्याचा उपयोग भाजपाला आगामी निवडणुकीत शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना घेरण्यासाठी करता येईल. हा मुद्दा मुंबईतील नागरी समस्या आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावर मोठा राजकीय संघर्ष निर्माण करण्याची शक्यता आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments