🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Oct 12
- 3 min read
Updated: Oct 14
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नागपूरसाठी ही बातमी म्हणजे विकासाच्या दिशेने एक भक्कम पाऊल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर नागपूरमध्ये उभारले जाणार आहे, हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. फडणवीस यांनी केवळ तांत्रिक सुविधा नव्हे, तर नागपूरच्या ऐतिहासिक वारशालाही अधोरेखित करणाऱ्या रचनेवर भर दिला—हीच त्यांची संवेदनशीलता आणि समृद्ध दृष्टिकोन दर्शवते. हे केंद्र केवळ प्रदर्शनांचे व्यासपीठ न राहता सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक संवादाचे केंद्र बनेल. स्पेनसारख्या आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबतचा हा करार महाराष्ट्राला जागतिक पातळीवर नेईल. पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानसंपन्न वास्तूच्या माध्यमातून नागपूरचे आकर्षण वाढवण्याचा फडणवीसांचा संकल्प निश्चितच कौतुकास्पद आहे. हे केंद्र नागपूरला नव्या ओळखी मिळवून देईल आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहील. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला सलाम!
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सावलकोट जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी देऊन मोदी सरकारने सिंधू जल कराराच्या मर्यादांना ठोस उत्तर दिलं आहे! चिनाब नदीवर उभारला जाणारा 1856 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प म्हणजे केवळ ऊर्जा निर्मितीच नव्हे, तर भारताच्या जलहक्काचा पुनःप्रत्यय. 31380 कोटींचा हा प्रकल्प जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठा ठरणार असून, त्यातून स्थानिक विकास, रोजगार आणि ऊर्जा स्वावलंबनाला चालना मिळणार आहे. पाकिस्तानात वाहून जाणाऱ्या पाण्यावर भारताचा नियंत्रण असणं हे राष्ट्रीय हिताचं आहे, आणि यावर कोणाचंही राजकीय मतप्रवाह थांबवू शकत नाही. ही केवळ पाण्याची नव्हे, तर सार्वभौमतेची बाब आहे. मोदी सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन जलसंपत्तीच्या वापरात भारताचा अधिकार अधोरेखित केला आहे. सावलकोट प्रकल्प म्हणजे सिंधू जल कराराला भावपूर्ण श्रद्धांजली आणि नव्या भारताच्या आत्मविश्वासाला सलाम.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 100% नवीन आयात शुल्क लावून जागतिक व्यापारात पुन्हा एकदा खळबळ निर्माण केली आहे. आधीच लावलेल्या टॅरिफ्सनंतर ही घोषणा म्हणजे ट्रम्प कोणालाही माफ करत नाहीत, याचा स्पष्ट संदेश आहे. हे फक्त आर्थिक दबाव नव्हे, तर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जगाला एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. "मेक अमेरिका ग्रेट अगेन" ही घोषणा आता व्यापार धोरणांमधूनही दिसू लागली आहे. चीनसारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थेवर टॅरिफ लावून ट्रम्प यांनी अमेरिकेचा आत्मविश्वास दाखवला आहे. हे पाऊल जागतिक राजकारणात अमेरिका पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे. ट्रम्प यांची ही आक्रमक शैली काहींना धोकादायक वाटू शकते, पण त्यांच्या समर्थकांसाठी हेच निर्णायक नेतृत्व आहे. जागतिक व्यापाराच्या पटावर ही चाल निश्चितच लक्षवेधी ठरणार आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारताचं परराष्ट्र धोरण आता केवळ सामर्थ्यावर नव्हे, तर संयम, सातत्य आणि रणनीतिक बुद्धिमत्तेवर आधारित आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दिल्ली भेटीने पाकिस्तानला स्पष्ट संदेश मिळाला—भारत दक्षिण आशियात केंद्रस्थानी आहे. तालिबान सत्तेत असूनही तहरीक ए तालिबान पाकिस्तान विरुद्ध कारवाई न झाल्यामुळे पाकिस्तान रोज चटके खातोय. दुरांड लाईनचा वाद, सीमाविवाद, आणि आय एस आय चा हस्तक्षेप यामुळे अफगाणिस्तान-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण आहेत. भारत मात्र भावनिक नव्हे, तर भौगोलिक जोडणीवर भर देतोय—चाबहार पोर्ट, बिमस्टेक, सेतुसमुद्रम यामुळे चीनच्या प्रभावाला पर्याय निर्माण होतोय. “दळणवळण सुविद्धा हेच चलन आहे” हा भारताचा संदेश आहे. अफगाणिस्तानने भारताच्या भूमिवरून पाकिस्तानला इशारा दिला आहे—आता भारताला दुर्लक्षित करणं अशक्य आहे. पाकिस्तानने संयमाची चाचणी घेऊ नये, कारण भारत दोन फ्रंटवरही सक्षम आहे—इतिहास साक्षी आहे!
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दिल्ली वारी होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे. भाजपाने एकट्याने या निवडणुका लढून आपली ताकद अजमावावी असा स्थानिक पदाधिकार्यांचा आग्रह आहे. त्या जोडीला स्थानिक नेतृत्वाला यातून संधी मिळेल अशी सुद्धा त्यांची इच्छा आहे. परंतु केंद्रात आणि राज्यात युती स्वरुपात काम करत असताना हे शक्य नाही असे देवेन्द्रजींनी स्पष्टपणे बजावले आहे. महायुती म्हणूनच आपल्याला लढावे लागणार आहे आणि एकजिनसी पद्धतीनेच आपण लढणार आहोत हे पण सांगितले आहे. तरीही दिल्लीश्वर ठरवतील तेच खरे. केंद्रातील सरकारला सध्या सहकार्याची गरज असल्याने तूर्तास तरी युतीनेच चलो रे हा निर्णय होणार यात शंका नाही.
🔽
#NagpurDevelopment #FadnavisVision #IndiaWaterPower #SawalkotProject #TrumpTariffShock #GlobalTradeMoves #IndiaForeignPolicy #AfghanistanDialogue #BJPStrategy #MahayutiPolitics












Comments