top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Aug 21
  • 3 min read

Updated: Aug 22

🖋️ अभिजीत राणे लिहितात

शशांक राव आणि प्रसाद लाड यांची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुख्य प्रवक्ते म्हणून निवड जाहीर करून आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट पतपेढी निवडणूकीत झालेल्या पराभवाच्या जखमेवर मीठ नव्हे तर जणू तिखट चोळले आहे. शशांक राव यांचे पॅनल भाजपा पेक्षा वेगळे होते पण शेलार यांनी ते भाजपाचे असल्याचे भासवून श्रेय घेऊन टाकले. शशांक राव यांना मुख्य प्रवक्ते करून ते भाजपा नेते असल्याचे अधोरेखित केले ही चतुर खेळी झाली. उद्या मुंबई महापालिका निवडणुकी नंतर भाजपाचे पहिले महापौर शशांक राव झाल्यास आश्चर्य वाटू नये.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने खळबळ उडाली हे स्वाभाविक आहे. दोघांनी खरोखरच काय चर्चा केली हे दोघेही सांगणार नाहीत हे उघड आहे. राज ठाकरे यांच्या राजकीय "हालचालीं"चे स्क्रिप्ट आणि डायरेक्शन फडणवीस यांचे असते हा समज दृढ करणारी आजची भेट आहे. ऑन द रेकॉर्ड दोघांनी काहीही सांगितले तरी उद्धव ठाकरे यांना धोका केव्हा कसा द्यायचा ह्याचेच ब्रिफींग फडणवीस देत आहेत ही ऑफ द रेकॉर्ड कन्फर्म न्यूज आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“भारताच्या खनिज सामर्थ्याला नवे पंख!” संसदेने मंजूर केलेले “खनिज व खनिजद्रव्ये (दुरुस्ती) विधेयक” हे खरोखरच ऐतिहासिक पाऊल आहे. लिथियम, कोबाल्ट, ग्रॅफाइट आणि दुर्मिळ धातूंच्या उत्खननासाठी खासगी गुंतवणूकदारांना परवानगी मिळाल्यामुळे भारताचे नशीब बदलणार आहे. दशकानुदशके जल-जंगल-जमीन चे तुणतुणे वाजवत नक्षली आणि कम्युनिस्टांनी विकास रोखला, तर दुसरीकडे चीनने याच धातूंच्या आधारे आपली अर्थव्यवस्था बळकट केली. भारत मात्र त्यांच्या सप्लायवर अवलंबून राहिला आणि अनेकदा त्याचा फटका बसला. पण आता मोदी सरकारने घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे भारताला आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग मिळणार आहे. खनिज क्षेत्रातील ही क्रांती केवळ उद्योगांनाच नव्हे, तर संरक्षण, तंत्रज्ञान आणि रोजगार क्षेत्रालाही गती देईल. हा आहे खरा बदल – जिथे राष्ट्रहित सर्वोच्च ठरते. सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन!

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“ठाकरे बंधूंचा फुगा फुस्स!” महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडणार, भाजपाला लोक लाथाडतील – अशा स्वप्नाळू आश्वासनांनी मीडियाने ठाकरे बंधूंच्या ‘एकत्र येण्याला’ भावनिक गाज चढवली. पण सत्य हे की, बेस्ट सोसायटीच्या निवडणुकीत 21 पैकी एकही जागा न मिळणे हा त्यांच्या गोट्याला मिळालेला जनतेचा स्पष्ट दणका आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर नव्हे तर बॅलेट पेपरवर झाली तरीही निकाल ‘भोपळा’च! म्हणजेच जनतेचा विश्वास आता त्यांच्यावर उरलेलाच नाही. ‘बेडूक फुगून बैल होत नसतो’ ही म्हण येथे अचूक लागू पडते. मीडियाने उगाच फुगा फुगवला, पण जनतेच्या न्यायालयात त्याचा फुसका आवाजच आला. ठाकरे बंधूंचे नाव आता मतपेटीत काहीच वजनदार राहिलेले नाही, हे निकालाने दाखवून दिले. आशा आहे की यानंतर तरी मीडिया खोट्या फुग्यात हवा भरणे थांबवेल आणि वास्तवाला मान्य करेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“महाराष्ट्र हायपरलूप क्रांतीचा अग्रदूत!” लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात जगातलं सर्वात क्रांतिकारी पाऊल महाराष्ट्राने टाकलं आहे! जवाहरलाल नेहरू पोर्ट, नवी मुंबई ते पालघर वाढवण बंदर जोडणाऱ्या हाय-स्पीड कार्गो कॉरिडॉरसाठी राज्य सरकारने आय आय टी मद्रासच्या इन्क्युबेशनमधील टूट्र हायपरलुप प्रायव्हेट लिमिटेड सोबत ऐतिहासिक करार केला आहे. लीनियर इंडक्शन मोटर आधारित या अत्याधुनिक हायपरलूप मोबिलिटी सिस्टमचा जागतिक स्तरावर लॅबच्या बाहेर होणारा हा पहिला प्रयोग ठरणार आहे. यामुळे मालवाहतुकीला वेग, कार्यक्षमता आणि सुरक्षिततेची नवी दिशा मिळणार असून महाराष्ट्र थेट जागतिक लॉजिस्टिक्स नकाशावर झळकणार आहे. मोदी सरकारच्या धोरणात्मक पाठबळासह महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा दूरदर्शी निर्णय खरोखरच गेम-चेंजर आहे. विकासाची नवी झेप महाराष्ट्रातूनच सुरू झाली आहे!

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा हवीच!” महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भात खोटा आणि दिशाभूल करणारा डेटा सोशल मीडियावर टाकून नंतर तो डिलीट करणाऱ्या सी एस डी एस या संस्थेच्या संजय कुमार यांच्यावर नागपूर पोलिसांनी दाखल केलेली एफ आय आर हा लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेला पहिला टप्पा आहे. भारतीय नागरिक संहिता कलम 175, 353(1)(ब), 212 आणि 340(1)(2) अंतर्गत नोंदवलेले गुन्हे हे किरकोळ नाहीत, कारण निवडणुकीत खोटी माहिती पसरवणे म्हणजे थेट मतदारांच्या विश्वासाशी गद्दारी करणे होय. या प्रकाराने समाजात गोंधळ निर्माण होतो, मतांवर परिणाम होतो आणि शेवटी लोकशाहीची पायाभरणीच हादरते. सरकारने या प्रकरणात अजिबात सौम्यता न दाखवता, कठोरातील कठोर कारवाई करावी हीच जनतेची अपेक्षा आहे. कारण ज्यांनी मतदारांचा विश्वास तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय अशा प्रवृत्तीवर आळा बसणार नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“आपची अराजकता उघड झाली!”सतत स्वच्छ राजकारणाच्या गप्पा मारणाऱ्या आम आदमी पार्टीचा मुखवटा पुन्हा एकदा फाटला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेला हल्ला हा काही तथाकथित ‘प्राणीप्रेमी’ किंवा ‘कुत्रालव्हर’ व्यक्तीचा प्रकार नाही, तर तो थेट गुजरातच्या आप आमदार गोपाल इटालिया यांच्याशी जोडला गेला आहे. ही केवळ योगायोगाची बाब नाही, तर आपचा अस्सल स्वभाव आहे! सुरुवातीपासूनच आंदोलन, गोंधळ, खोटे आश्वासनं आणि अराजकता यावरच ही पार्टी उभी राहिली. कधी न्यायालय, कधी पोलीस, कधी विरोधक यांच्यावर गलिच्छ हल्ले करणे, रस्त्यावरच्या गोंधळातून राजकारण करणे आणि आता मुख्यमंत्रीवरच हल्ला करणे—हेच आपचं खरं रूप आहे. केजरीवाल यांनी दाखवलेले ‘पर्यायी राजकारण’ हे खरेतर अराजकतेचे पोसलेले झाड आहे. लोकशाही शिस्तीवर चालते, गोंधळावर नाही. भारत अशा गुन्हेगार पोसणाऱ्या अराजकतावादी पक्षाला कधीच माफ करणार नाही!

🔽


ree
ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page