🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Aug 19
- 3 min read
Updated: Aug 22
🖋️ अभिजीत राणे लिहितात
विधानसभेत वेगळ्या धार्मिक अधिकारांची मागणी करणारा प्रस्ताव मंजूर करणाऱ्या झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर मुंडन केले तसेच काल त्यांनी रामगड येथील माँ छिन्नमस्तिके यांच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला.आणि सनातन धर्मानुसार श्राद्धकर्म केले. अनेकदा असेही दिसून आले आहे की, ते कुटुंबासह नियमितपणे मंदिरांमध्ये पूजा-अर्चा करण्यासाठी जातात. मग समाजामध्ये कोणाच्या दबावामुळे ते असे फुटीरतावादी विचार पसरवत आहेत? कोणाच्या दबावाखाली येऊन त्यांनी वेगळ्या धर्माची मागणी करणारा प्रस्ताव मंजूर केला? त्यांनी अशा शक्तींचा चेहरा देशासमोर उघड करायला हवा, ज्या सनातन धर्म आणि देशाच्या मूळातून आदिवासी समाजाला तोडू इच्छितात.या घटनेतून आदिवासी समाजाने अशा लोकांच्या चारित्र्याचा अभ्यास करायला हवा आणि फुटीरतावादी विचार तसेच वेगळ्या धर्माच्या मागणीमागचे सत्य समजून घ्यायला हवे, जेणेकरून समाजाची एकता आणि ताकद कमी होणार नाही. संस्कृती सर्वांची एक सनातन आहे, आणि रक्त नसांमध्ये हिंदू आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नॉर्वेच्या अर्थमंत्र्याला थेट धमकी देत डोनाल्ड ट्रंप यांनी “नोबेल द्या नाहीतर टॅरिफ लावू” अशी उघड दादागिरी केली. हा प्रकार त्यांच्या राजकारणातील टॅरिफ दहशतवादाचे ताजे उदाहरण आहे. शांतता व मानवकल्याणासाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराला राजकीय दबावाचे हत्यार बनवणे ही जगाच्या सन्मानाची उघडी विटंबना आहे. ट्रंप यांचे धोरण हे लोकशाही, शिष्टाचार व आंतरराष्ट्रीय संबंध यांना हरताळ फासणारे आहे. अमेरिकेच्या आर्थिक बळावर इतरांना झुकवणे ही त्यांची वसाहतवादी वृत्ती उघड करते. राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रतिमेला साजेसा संयम, विवेक किंवा व्यापक दृष्टी न दाखवता, धमकी व दादागिरी हा मार्ग अवलंबणारे ट्रंप जगात अमेरिकेची प्रतिमा मलिन करत असून ट्रंप यांच्या वागण्याला संपूर्ण जग कंटाळले आहे. याचा परिणाम म्हणून लोकांच्या मनात अमेरिकेबद्दल द्वेष निर्माण होतो आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अमित शहा यांना “देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री” म्हणणे ही अतिशयोक्ती ठरते. शरद पवार यांनी केलेल्या टीकेत फक्त राजकीय चिड आणि वैयक्तिक द्वेष दिसून येतो. 2014 साली देशांतर्गत सुरक्षेची सर्वात मोठी आव्हाने पाकिस्तानची घुसखोरी, दहशतवाद आणि नक्षलवाद हीच होती. या साऱ्यांना उत्तर देताना शहा यांनी कणखर धोरण राबवले. जम्मू–काश्मीरमधून कलम ३७० हटवणे, नक्षलवादाला निर्णायक धक्का देणे आणि सीमेवरील सुरक्षा वाढवणे ही त्यांची ऐतिहासिक कामगिरी आहे. त्यांचा प्रत्येक निर्णय राष्ट्रहितासाठीच होता, वैयक्तिक सूडबुद्धीपोटी नव्हता. याउलट पवारांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत भ्रष्टाचार, जातीय समीकरणे आणि सत्तेसाठीच्या तडजोडी याचाच पुरस्कार केला. आज देशभक्त जनतेच्या नजरेत शहा कणखर गृहमंत्री म्हणून उभे आहेत; पवार मात्र एक हतबल, दिशाहीन आणि भूतकाळात अडकलेले नेते म्हणूनच दिसतात.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोग यांच्या विरुद्ध कोंग्रेस आणि राष्ट्रीय कपुत यांनी आघाडी उघडली आहे. वोटचोर नावाची अजून एक अंगलट येणारी घोषणा घेऊन कोंग्रेसची नाटके सुरू झाली आहेत. कोंग्रेसची संपूर्ण देशातील ढासळलेली प्रतिमा बघता त्यांच्या या आंदोलनाला कोणीही पाठिंबा देण्याच्या मनःस्थितीत नाहीत. इंडिया आघाडी नाईलाज म्हणून उपस्थित रहात आहेत. त्यामुळे कोंग्रेस पक्षाने आज पुण्यात अण्णा हजारे यांना आंदोलन करा म्हणून आवाहन करणारी फ्लेक्स बोर्ड बाजी करण्याचा प्रयास केला. व्होट चोरी होत आहे, अण्णा आता आंदोलन करणार का ? असा प्रश्न या फ्लेक्स बोर्डावरून विचारला गेला. परंतु अण्णांनी या प्रचारक मंडळींचे दात त्यांच्याच घशात घातले. अण्णा हजारे म्हणाले,’ माझे वय 90 वर्षे आहे या वयात सुद्धा मी आंदोलन करावे अशी या लोकांची अपेक्षा आहे. तुम्ही तरुण आहात तुम्ही सुद्धा ही लढाई माझ्या पद्धतीने लढू शकता की. “ अण्णांच्या या वक्तव्यामुळे कोंग्रेसी मंडळींचा हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याचा उपद्व्याप फसला आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अभिजीत राणे लिहितात,
विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 5 नंतर वाढलेल्या 76 लाख मतदाना संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जून २०२५ मध्येच उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. संपूर्ण दिवस यावर घालवला गेला यावरही कोर्टाने उद्विग्नता व्यक्त केली. संपूर्ण याचिका एका वर्तमानपत्रावरच्या बातमीवर असून कुठलेच दावे ग्राह्य मानण्याजोगे नाहीत हे कोर्टाने म्हटलं होतं. थेट कोर्टात येण्यापूर्वी निवडणूक आयोगाशीही कोणताही वार्तालाप याचिकाकर्त्याने केला नव्हता. शिवाय हा कायद्याचा ढोबळ गैरवापर (ग्रॉस अब्युज ऑफ लॉ) आहे हे ही कोर्टाने म्हटलं.काल सुप्रीम कोर्टात ही याचिका फेटाळली गेली. पेपरमधल्या बातमीवर आधारित माहितीवर याचिका दाखल करणारे धन्य. त्याचबरोबर हायकोर्टातली ग्राऊंड्स न पाहता सुप्रीम कोर्टात फायलिंग करणारेही धन्योत्तम.
🔽
#Politics #India #Leadership #Truth #Democracy #Governance #NationFirst #GlobalAffairs #Justice #Unity #Accountability





Comments