🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Aug 13
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
नर्मदा आंदोलन आणि सामाजिक चळवळींचा प्रदीर्घ अनुभव असणार्या कार्यकर्त्या म्हणून मेधा पाटकर प्रसिद्ध आहेत. पण आज त्या न्यायालयाच्या अवमान प्रकरणात दोषी ठरल्या असून त्यांना पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशांकडे सातत्याने दुर्लक्ष, दिलेल्या आश्वासनांचे पालन न करणे आणि आंदोलनाच्या नावाखाली न्यायप्रक्रियेत अडथळा आणल्याचे आरोप सिद्ध झाले असून त्यांना शिक्षा ठोठावली गेली आहे. यामुळे एकेकाळी ‘जनआंदोलनाचा चेहरा’ मानल्या जाणाऱ्या पाटकर यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यांच्या समर्थकांकडून ही शिक्षा अन्यायकारक असल्याचा आरोप होत असला, तरी या निमित्ताने कायद्यापुढे सर्व समान हेच सिद्ध झाले आहे. हा निकाल केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसून, सामाजिक आंदोलनांच्या मार्गाने न्याय मिळवण्याचा दावा करणाऱ्यांनीही कायदेशीर मर्यादा पाळल्या पाहिजेत, हा स्पष्ट संदेश देऊन गेला आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
विरोधी पक्षातील खासदारांची पातळी किती घसरली आहे, याचे ताजे उदाहरण म्हणजे राहुल गांधींची अक्कलशून्य वर्तन आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितले होते की फक्त ३० खासदारांनी भेटीस यावे, तरीही राहुल गांधी ३०० खासदारांचा लवाजमा घेऊन गेले. मग आयोगाने भेट नाकारली, तर कांगावा सुरू! जरा विचार करा ३० ऐवजी ३०० लोक अचानक भेटायला आले, तर कोणीही भेटू शकेल का ? मग इतरांनी या कोंग्रेसी उर्मट युवराजाच्या बालहट्टासाठी नियम मोडावेत ही कसली दादागिरी? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या स्पष्ट चुकीच्या पावलावरही राहुल गांधींचे खासदार आणि इंडिया आघाडीचे सुद्धा खासदार आंधळेपणाने त्याच्या मागे उभे राहतात. नियम, शिस्त, सामान्य बुद्धी—या गोष्टींना विरोधी पक्षाच्या खासदारांच्या राजकारणात स्थान उरलेले नाही. जगात असा नालायक विरोधी पक्ष दुसरीकडे सापडणे अशक्य आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
काँग्रेसच्या अंतर्गत असणार्या नाराजीचे संकेत पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहेत. सोनिया गांधींचे जिवलग आणि विश्वासू सहकारी अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी थेट नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे कौतुक करून काँग्रेसमध्ये खळबळ उडवली आहे. मोदी-शहा यांच्या नेतृत्व कौशल्याचे आणि विकासदृष्टीचे सार्वजनिक कौतुक केल्याने राहुल गांधींच्या नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अहमद पटेल हे काँग्रेसच्या धोरणात्मक निर्णयांचे महत्त्वाचे शिल्पकार मानले जात, आणि त्यांचा वारसदारच भाजप नेतृत्वाची प्रशंसा करतो, ही गोष्ट पक्षासाठी मोठा धक्का ठरत आहे. याला ‘काँग्रेस परिवारातील दिग्गजांकडून राहुल गांधींना दाखवलेला आरसा असेच मानले जात आहे. विरोधी पक्षातील गोंधळ, नेतृत्वावरचा अविश्वास आणि सतत होणारे मानापमान नाट्य हे चित्र आता उघडपणे समोर येत आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
निवडणूक जवळ आली की कोणत्याही मुद्द्यावरून वाद पेटवणे आणि सामाजिक शांतता भंग करण्याच्या ऊचापती सुरू होतात. कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या आदेशानुसार १५ ऑगस्ट—स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमी लक्षात घेऊन—मटण विक्रीस २४ तासांसाठी बंदी घातली आहे. प्रशासनानं हे 'शांतता आणि राष्ट्रीय विधी पालन' कारण दाखवून नोटिफिकेशन काढले असून १९८८ पासून दरवर्षी हा आदेश दिला जात असल्याचे सांगितले आहे. मात्र, यात राजकारण संधी दिसल्याने विरोधी पक्ष सक्रिय झाला आहे. एनसीपी (एसपी)चे विधायक जितेंद्र आव्हाड यांनी "खाण्याच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण आणले " म्हणून १५ ऑगस्टला मटण पार्टी आयोजित करण्याची घोषणा केली आहे. शिवसेना (उद्धव)चे आदित्य ठाकरे यांनी "प्रशासन लोकांना काय खायचं हे ठरवू शकत नाही" अशी टीका केली आहे आणि कमिशनरच्या निलंबनाची मागणी केली आहे नागपूरसह काही अन्य शहरांमध्येही अशाच बंदी आदेशांमुळे राजकीय आणि सांस्कृतिक वाद पेटले आहेत.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
डोनाल्ड ट्रंप यांच्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानला परत एकदा मस्ती आली आहे. पाकिस्तानी नेत्यांची बेताल वक्तव्ये आणि युद्धखोरीची भाषा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अमेरिकेत झालेल्या एका कार्यक्रमात आसिफ मुनीर यांनी भारतावर अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत चिथावणीखोर विधान केले. त्यात त्यांनी भारताची तुलना मर्सिडिज गाडीशी आणि पाकिस्तानची तुलना कचरा नेणाऱ्या डम्पर ट्रकशी करत, “डम्पर जसा मर्सिडिजला चिरडतो, तसे आम्ही भारताला चिरडू” असा उर्मट दावा केला. अशा वक्तव्यांतून पाकिस्तानची अस्वस्थ मानसिकता, युद्धात स्वतःचे नुकसान विसरून केवळ भारतद्वेषातून बोलणारे नेतृत्व, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण करण्याची प्रवृत्ती स्पष्ट होते. भारताकडून संयम राखला जात असला, तरी अशा धमक्या फक्त पाकिस्तानच्या असमर्थतेचे आणि आत्मविनाशाकडे नेणाऱ्या राजकारणाचे दर्शन घडवतात.
🔽
#MedhaPatkar #ContemptOfCourt #RahulGandhi #OppositionPolitics #CongressCrisis #FaizalPatel #KalyanDombivli #MeatBanRow #PakistanThreats #DonaldTrump #AbhijeetRane





Comments