top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jul 4
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आज राहुल गांधीची लोकसभेत सभागृहाचा नेता म्हणून निवड झाल्याला एक वर्ष पूर्ण झाले.या एक वर्षात विपक्ष नेता म्हणून त्याने केलेल्या कामाला काँग्रेस ने १०० पैकी १०० गुण असे रेटिंग दिले आहे,असे आता रात्री १०.२६ वाजता mirror now नावाच्या इंग्लिश टीवी चॅनेलवर चालू असलेल्या चर्चेत दाखवले जात आहे. त्याशिवाय काँग्रेसने त्याला शॅडो पी.एम्. असे म्हणून त्याचा गौरव ही केला आहे. प्रत्यक्षात त्याने असे काय काम केले की ज्यामुळे त्याला पैकीच्या पैकी गुण देण्यात आले आहेत ते मात्र कोणी सांगत नाहीये. वास्तवात राहुल गांधी यांनी विरोधीपक्ष नेता म्हणून जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलिन करणे वगळता काहीही काम केलेले नाही. पण हे बोलण्याची एकाही कोंग्रेसी गुलामाची हिम्मत नाहीत. सगळे एकजात शेपट्या हलवणारे कुत्रे. मध्यप्रदेश कोंग्रेस मधील नेते कमलनाथ एकदा म्हणाले होते की तुम्ही कोंग्रेसी नेत्यांना राहुलचे मूत्र प्यायला सांगितले तर ते सुद्धा ते आनंदाने करतील. वरपासून खालपर्यंत सर्व कोंग्रेसी एकसारखे आहेत, ते गांधी घराण्याचे दासानुदास आहेत. संपूर्ण कोंग्रेस पक्षात झाडून कणाहीन माणसे भरली आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

नीतेश राणेंनी ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे. ते म्हणाले,” राज ठाकरे यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावरील दादरचे बंगाली (की बांगलादेशी?) फेरीवाले असोत की उद्धवच्या घराशेजारी असलेल्या बेहरामपाड्यातील मुसलमान, या दोन्ही सेनेने कृष्णकुंज/ शिवतीर्थ किंवा मातोश्री-1/ मातोश्री-2 च्या शेजारच्या एकही मुसलमानाला चोपलेला दाखवा! मी 1000% गॅरंटी देतो - नाही मिळणार!! मराठी माणसाचे आणि मराठीचे सर्वाधिक नुकसान जर कोणी केले तर यांच्या याच स्वयंघोषित 'ब्रँड ठाकरे'ने! आता हे हिंदुत्वाचे नुकसान करत आहेत, हिंदूंनाच मारून. बरं, मराठी बोलत नाही म्हणून यांनी अख्ख्या महाराष्ट्रात चोपलेला एक मुसलमान मला दाखवा, वाट्टेल ती पैज हरेन. ओपन चॅलेंज!!” ठाकरे बंधु राणेंचे हे आव्हान स्वीकारणार का ? कारण दोन दिवसांपूर्वी मराठी बोलत नाही म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी एका दुकानदाराला चोपून काढले आणि तो मुसलमान आहे समजल्यावर पुष्पगुच्छ देऊन त्याची माफी सुद्धा मागितली.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राजकारण आणि समाज कारणातील सहिष्णुता आणि प्रामाणिकपणा लोप पावतो आहे. बाळासाहेब ठाकरे यांची एकदा एका हिन्दी चॅनेलवाल्याने मुलाखत घेतली. बाळासाहेब स्पष्टपणे बोलले. मी दारू पितो , सिगार ओढतो.. आणि पत्रकाराला विचारू लागले तू काय करतोस ? तो म्हणाला मी या पैकी काहीच करत नाही तर बाळासाहेब म्हणाले मग तुझा जगून काय फायदा ? काल सोशल साईटवर एकाने राज आणि उद्धव यांच्यावर थोडीशी मर्यादा सोडून टीका केली, बाळासाहेब असते तर म्हणाले असते हो मी शौक करतो आणि माझ्या पैशाने करतो तुला काय त्रास होतो? परंतु बाळासाहेब नसल्याने राज ठाकरे यांच्या समर्थकांनी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन धिंगाणा घातला पोलिसांनी खबरदारी म्हणून पोस्ट करणार्‍यालाच अटक केली आहे. महाविकास आघाडी राजवटीत सुद्धा कंगना राणावत, निखिल भामरे, केतकी चितळे, अर्णब गोस्वामी यांना मर्यादाहीन टीका केली म्हणून अटक झाली आहे. त्यामानाने कोंग्रेसी जरा निबर कातडीचे असतात. तुम्ही कितीही टीका केली तरी ते विचलित होत नाहीत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

“उडता महाराष्ट्र होऊ दिला जाणार नाही.” अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्याची देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. ही करताना त्यांनी धक्कादायक कबुलीजबाब सुद्धा दिला आहे. ड्रग्स च्या या व्यवसायात पोलिस कर्मचार्‍यांचा सुद्धा थेट सहभाग आढळून आला असल्याची कबुली देत त्यांनी यापुढे अश्या कर्मचार्‍याला आता सेवेतून निलंबनाऐवजी थेट बडतर्फ करण्यात येसील अशी त्यांनी घोषणा केली आहे. बंद पडलेल्या केमिकल फॅक्टऱ्यांमध्ये सिंथेटिक ड्रग्ज तयार होत असल्याचे आढळून आल्याने, तेथेही तातडीने कारवाई करण्यात येत आहे. अमली पदार्थविरोधी लढा केवळ पोलीस आणि गृह विभागापुरता न राहता संपूर्ण शासकीय यंत्रणेद्वारे राबवण्यात येणार असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर अमली पदार्थांचे उदात्तीकरण थांबवण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील असेही ते म्हणाले. महाराष्ट्रचा उडता महाराष्ट्र होणार नाही , होऊ दिला जाणार नाही याप्रती त्यांनी दाखवलेली कटिबद्धता स्पृहणीय आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

बाळासाहेब ठाकरे यांनी "दोपहर का सामना" सुरु केला १९९३ ला.जेव्हा बाळासाहेब प्रखर मराठी होते, तेव्हा मुंबईतील हिंदी वर्ग वाढला, उत्तर प्रदेश संघ निर्माण झाला.. बाळासाहेबांनीच संजय निरूपम सारखा नेता घडवला.पुढे सेना हिंदुत्ववादी झाली, बाळासाहेब "हिंदुहृदयसम्राट" झाले आणि मुंबई मुस्लिम होऊ लागली.. दादर स्टेशन बाहेरचे हिंदू दुकानदार जाऊन तिकडे सगळे मुस्लिम झाले.. असे अनेक एरिया मुस्लिम झाले.गेल्या ३५ वर्षातील सत्तेत शिवसेनेने मुंबई तील मराठी माणूस संपवला आणि मुंबई मुस्लिम करून टाकली.मराठी माणसाने शिवसेनेवर विश्वास ठेवला आणि स्वतःचे अस्तित्व गमावले.गुजराती जागृत राहिला आणि अजूनही मुंबईमध्ये तो बळकट आहे.जाणकारांनी १९७८ मध्येच भाकीत केलं होतं की की बाळा (नंतर बाळासाहेब) ठाकरे मराठी माणसाचं जास्त नुकसान करेल. आणि ते खरं ठरले आहे. ठाकरे ब्रँड ने मराठी मराठी चा ढोल बडवून मराठी माणसाचं पूर्ण माकड केलं आहे.

🔽

ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page