अजित पवार नावाचा नवीन महापुरुष बनत आहे. भारतातील अनेक सरकारी उपक्रम...
- dhadakkamgarunion0
- 1 day ago
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अजित पवार नावाचा नवीन महापुरुष बनत आहे. भारतातील अनेक सरकारी उपक्रम म्हणजे नेहरू गांधी यांची मालमत्ता बनल्यासारखे आहे. तेच पवार या वादग्रस्त घराण्याने सुरू केले आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्युचे दुःख असले तरीही पवार कुटुंबीय धुतले तांदूळ नव्हते हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महापुरुष या शब्दाची चीड यावी इतक्या घाण पद्धतीने अनेक नवीन महापुरुष तयार केले जात आहेत व राजकारणासाठी जनतेवर लादले जात आहेत. काही महापुरुष तर खोटे नरेटिव्ह व खोट्या कथा रचून बनवले जात आहेत. राज्य शासनाने बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामांतराचा मोठा निर्णय घेतला असून, आता या संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी या महाविद्यालयाचे नामकरण 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय' असे करण्यात आले होते. मात्र, आता अहिल्यादेवींचे नाव हटवून त्याऐवजी अजित पवार यांचे नाव देण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बारामती विमानतळावर झालेला भीषण अपघात हा केवळ तांत्रिक बिघाड नसून, वर्षानुवर्षे झालेल्या सुरक्षेच्या दुर्लक्षामुळे ओढवलेली शोकांतिका आहे. AAIB च्या अहवालाने या विमानतळाची दयनीय अवस्था जगासमोर आणली आहे. २०१६ पासून धावपट्टीचे मार्किंग न करणे, हवामान मोजणारी यंत्रणा नसणे आणि रात्रीच्या उड्डाणांसाठी अत्यावश्यक 'रनवे लाईट्स'चा अभाव, हे दोष या अपघाताला कारणीभूत ठरले.विशेष म्हणजे, ज्या 'अकादमी ऑफ कार्व्हर एव्हिएशन'मध्ये ५०० विद्यार्थी ४० लाखांपर्यंत फी भरून शिक्षण घेतात आणि जिचे थेट संबंध राज्याच्या प्रभावशाली पवार कुटुंबाशी आहेत, तिथे साध्या एक कोटी रुपयांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. हजारो कोटींच्या राजकीय चर्चांमध्ये सुरक्षिततेसाठी लागणारी ही अल्प रक्कम दुर्लक्षित राहिली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळाचा कायापालट करण्याची घोषणा करत आहेत, पण ही तत्परता आधी दाखवली असती, तर आज अजितदादा नक्कीच आपल्यामध्ये असते.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात
खरतर तसा बराच लेट झाला आहे ही पोस्ट टाईप करायला… शिंदे साहेबांच्या कार्यशैलीचा निस्सीम चाहता, शिवसेना परिवाराचा सदस्य ह्या नात्याने तर सुपरलेट… पण अगदी खरं सांगायचं तर संपूर्ण जगात कुठेतरी एखादा मराठी माणूस अचानक एखाद्या आकस्मिक संकटात अडकणं, तिकडे त्या माणसांची आणि इकडे त्यांच्या घरच्यांच्या जीवाची घालमेल सुरू असणं आणि अशा परिस्थितीत शिंदे साहेबांनी उस्फूर्तपणे संकटमोचकाच्या भूमिकेत येत संकटातल्या माणसाला सुखरूप आपल्या घरी पोहचवणं, कुठलीच अपेक्षा न ठेवता लागेल त्या मदतीला धाऊन जाणं हा सगळा सिक्वेन्स आता इतका रुटीन झाला आहे की त्या बद्दल प्रत्येक वेळी त्यांचे आभार कसे मानत राहणार? प्रत्येक वेळी त्या बद्दल नव्याने काय लिहिणार ? संकटात शिंदे साहेबांची सुपर हिरो सारखी एंट्री हे आता जगभरातील मराठी लोकांना इतके नित्याचे झाले आहे की खऱ्या आयुष्यात कोणतीही नैसर्गिक किंवा राष्ट्रीय आपत्ती आली की आख्खी पब्लिक जानती हैं की अब किसकी एंट्री होने वाली हैं…!
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
फक्त 60 दिवसाचा इंधनसाठा बाकी आहे म्हणून भारतातील मीडियाने नागरिकांना घाबरवून टाकायला सुरुवात केली आहे. लगेच पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. आपली सामान्य जनता अत्यंत भेकड आहे. आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा त्रास सहन करायची तयारी नसते. आपण कोणत्याही स्वरूपाचा त्याग करू शकत नाही. कष्ट , घाम आणि रक्त अर्पण करणे तर फार दूरची गोष्ट आहे आणि भारतातील काही अर्धवट युद्ध उन्माद झाल्यासारखा आरडा ओरडा करत आपल्या परराष्ट्र धोरणावर टीका करत आहेत. आज अरब राष्ट्रात तब्बल 1 कोटी भारतीय नागरिक नोकरी करत आहेत. अरब राष्ट्रांशी भारताचा व्यापार 80 अब्ज डॉलर इतका आहे. याउलट इराण शी आपला व्यापार फक्त 1.4 अब्ज डॉलर आहे. इराण आणि अमेरिका इस्रायल भांडणात आपण कुणाचीही बाजू घेतलेली नाही. याचा लाभ नंतर इराण च्या पुनर्निर्माण होईल त्यावेळी दिसून येईल. प्रत्येक वेळी शड्डू ठोकला म्हणजेच मर्द या मांनासिकतेतून मीडिया बाहेर येईल तो सुदिन.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
फक्त ६ किलोमीटर अंतर कमी करण्यासाठी तब्बल ६५०० कोटींचा खर्च?? सरकार एवढा खर्च का करत आहे? एक्स्प्रेस वे मधील एक महत्वाचा टप्पा लोणावळा घाट परिसरातील कठीण भूप्रदेश, तीव्र उतार, तीक्ष्ण वळणे, दाट धुके आणि वारंवार होणारे भूस्खलन यामुळे येथे सुरक्षित आणि सरळ मार्ग निर्माण करणे अत्यंत आव्हानात्मक होते. मिसिंग लिंक ही सुरक्षितता आणि वेग प्रदान करतो. या प्रकल्पाअंतर्गत दोन भव्य बोगदे आणि एक केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. एकूण लांबी सुमारे १०.५५ किलोमीटर असून २३.५ मीटर रुंदीचा हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. १५० मीटर उंचीवर उभारलेला केबल-स्टेड पूल तर अभियांत्रिकी कौशल्याचा अप्रतिम नमुना आहे..दररोज ३० मिनिटांचा वेळ वाचवणारा, जवळपास ६ किलोमीटर अंतर कमी करणारा आणि इंधनाची बचत घडवणारा हा प्रकल्प केवळ शॉर्टकट नाही. तो सुरक्षिततेची हमी, पर्यावरणीय बचत आणि आर्थिक कार्यक्षमतेचा दीर्घकालीन पाया आहे..
🔽
#MaharashtraPolitics #AjitPawar #BaramatiAirport #PoliticalDebate #InfrastructureDevelopment #EknathShinde #PublicPolicy #IndiaPolitics #MediaNarrative #Governance








Comments