हिंदुत्वावरील वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आव्हाडांना फटकारले
- dhadakkamgarunion0
- Aug 7
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
हिंदुत्वावरील वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आव्हाडांना फटकारले
● जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्म आणि हिंदुत्वावर केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आव्हाडांना त्यांची योग्यता, ‘जागा’ दाखवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आणि कठोर शब्दांत आव्हाडांवर निशाणा साधला आहे. आव्हाडांच्या विधानाला उत्तर देताना फडणवीसांनी त्यांची लायकी आणि जागा दाखवून दिली, असे म्हटले जात आहे. आव्हाडांनी सनातन धर्माचा अपमान केला असून केवळ मतांच्या राजकारणासाठी ते असे वक्तव्य करत असल्याचे फडणवीस म्हणाले. केवळ मतांचे राजकारण करण्यासाठी आणि समाजात फूट पाडण्यासाठी आव्हाड अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीत सर्वसमावेशकतेचा आणि विविधतेचा सन्मान केला जातो. आव्हाडांच्या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्या असून, मतांसाठी अशा प्रकारची वक्तव्ये करणे महाराष्ट्राला सहन होणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments