अपघातावर घाणेरडे राजकारण करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी फटकारले
- dhadakkamgarunion0
- 1 hour ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
अपघातावर घाणेरडे राजकारण करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी फटकारले
● राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना, आता या घटनेवरून राजकीय वाकयुद्ध पेटले आहे. या अपघातामागे घातपात असल्याचा संशय काही राजकीय नेत्यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कडक शब्दांत सुनावले असून, मृत्यूवर राजकारण करणे ही अत्यंत खालची पातळी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की, ‘ममता दीदींनी केलेले विधान अत्यंत चुकीचे आणि निराधार आहे. शरद पवार यांनी स्वतः हा एक अपघात असल्याचे स्पष्ट केले असताना, बाहेरच्या राज्यातील नेत्यांनी यात मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये.’ शेवटी फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावत म्हटले की, राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत, पण कोणाच्या चितेवर आपली राजकीय पोळी भाजणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. अजित दादांच्या निधनाने झालेली पोकळी भरून निघणारी नाही, त्यामुळे किमान अशा वेळी तरी संवेदनशील राहावे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments