रवींद्र चव्हाण : डोंबिवलीचे आमदार ते महाराष्ट्र भाजपाचे सारथी
- dhadakkamgarunion0
- 15 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
रवींद्र चव्हाण : डोंबिवलीचे आमदार ते महाराष्ट्र भाजपाचे सारथी
● भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व बनले आहेत. त्यांच्या कामाचा उरक आणि शांत पण तितकाच आक्रमक स्वभाव यामुळे त्यांनी पक्षात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. डोंबिवलीचे आमदार म्हणून सलग चार वेळा निवडून येणाऱ्या चव्हाण यांच्याकडे आता राज्याची धुरा असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत होत आहे. रवींद्र चव्हाण हे आपल्या संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. विरोधाभास असलेल्या परिस्थितीमध्येही शांत राहून योग्य निर्णय घेण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. 'गाव-वस्ती संपर्क अभियान' आणि 'संघटन पर्व' यांसारख्या मोहिमांद्वारे त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाशी जोडण्याचे काम केले आहे. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात अत्यंत सामान्य पातळीवरून केली. भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, त्यानंतर नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष असा टप्पा पार करत ते विधानसभेवर पोहोचले. २००९ पासून डोंबिवली मतदारसंघात त्यांनी आपली पकड मजबूत ठेवली आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments