स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला कानमंत्र
- dhadakkamgarunion0
- Aug 3
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला कानमंत्र
● आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्व ताकदीनिशी उतरण्याची तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून वर्धा येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या विदर्भ भाजपाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत कानमंत्र दिला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी तयारीला लागा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पक्षांतर्गत वाद आणि गटबाजीला थारा देऊ नका, असा कडक इशारा त्यांनी दिला आहे. निवडणुकीच्या काळात पक्षाला कमजोर करणाऱ्या कोणत्याही कृत्याला सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. पक्ष एक कुटुंब आहे आणि कुटुंबात छोटे-मोठे वाद होतात, पण निवडणुकीच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. जे गटबाजी करून पक्षाचे नुकसान करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. पक्षाच्या हिताला प्राधान्य देणे हे प्रत्येक कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments