सुधारित युवा धोरणातून शाश्वत परिवर्तनाची वाटचाल; मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार
- dhadakkamgarunion0
- Jul 13
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
सुधारित युवा धोरणातून शाश्वत परिवर्तनाची वाटचाल; मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार
● 'बदलत्या सकारात्मक विचारधारेचा समावेश केल्यासच युवा धोरण परिवर्तन घडवू शकते', असे ठाम मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. 'विकसित भारत २०४७' या दृष्टीने महाराष्ट्रातील युवकांसाठी नव्या पिढीच्या गरजांशी सुसंगत आणि प्रेरणादायी सुधारित युवा धोरण राबवण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. फडणवीस म्हणाले की, 'युवकांच्या विचारसरणीमध्ये आज प्रचंड बदल झाला आहे. त्यांच्या आकांक्षा, दृष्टीकोन, आणि जगण्याच्या पद्धतीही नव्या दिशेने जात आहेत. त्यामुळे हे धोरणही पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन, नव्या विचारांची पाऊले उचलणारे असावे.' शहरी व ग्रामीण युवकांना समान संधी मिळावी यासाठी समतोल, समावेशक आणि व्यावहारिक धोरण तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले. युवक कल्याण विभागाबरोबरच इतरही विभागांनी समन्वय साधून हे धोरण प्रभावीपणे राबवावे, असेही स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले आहेत.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments