top of page

सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

  • dhadakkamgarunion0
  • May 9
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र सायबरच्या नाविन्यपूर्ण नागरिक केंद्रित उपक्रमां’चे उदघाटन केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, सायबर फसवणुकीसंबंधीचे कॉल्स मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे अशा कॉल्सना उत्तरे देणे व नागरिकांना माहिती मिळण्यासाठी चॅटबॉट व माहितीपट महत्त्वाचे ठरणार आहेत. नोकरीचे आमिष दाखवून परदेशात नेऊन विक्री करण्यासारख्या घटना रोखण्यासाठीही यापुढील काळात जनजागृती करावी. मानवी तस्करीमध्ये लोकांना वाईट पद्धतीने वागविले जाते. त्यामुळे यासारखे अमानुष प्रकार बंद करण्यासाठी जनजागृती उपक्रम महाराष्ट्र सायबरने हाती घ्यावा, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष सायबर सुरक्षा विषयक माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page