सरसंघचालकांच्या हिंदू-मुस्लिम सहअस्तित्वाच्या विचारांचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून समर्थन
*[ ⏺️ पंचनामा ]*
▪️==================▪️
*सरसंघचालकांच्या हिंदू-मुस्लिम सहअस्तित्वाच्या विचारांचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून समर्थन*
● सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हिंदू-मुस्लिम सहअस्तित्वावरील विचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम पाठिंबा दर्शवला आहे. हिंदुत्वाची मूळ ओळख सहिष्णुतेतच सामावलेली आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे. फडणवीस यांच्या मते, हिंदू सभ्यता जगातील सर्वांत जुनी संस्कृती असून ती केवळ आपल्या तत्त्वनिष्ठतेमुळे टिकून राहिली आहे. भारताने इतिहासात अनेक परकीय आक्रमणे पचवली, आक्रमकांना सामावून घेतले आणि जगाने नाकारलेल्या लोकांनाही आपल्या मुख्य प्रवाहात सन्मानाने स्थान दिले. हे केवळ हिंदू विचारसरणीतील सहिष्णुतेमुळेच शक्य झाले. सहिष्णुतेचा अर्थ समजावताना फडणवीस म्हणाले की, ‘सहिष्णुता म्हणजे मार खाणे नव्हे, तर सर्वांना सोबत घेऊन सर्वधर्मसमभावाने प्रत्येकाला सन्मान देणे होय.’ हिंदूंना सहिष्णुतेचे धडे वेगळे देण्याची गरज नसून ती हिंदूंच्या रक्तातच भिनलेली आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. सहिष्णुता, सर्वसमावेशकता आणि सर्व धर्मांचा आदर हीच खरी हिंदुत्वाची शिकवण असल्याचे स्पष्ट करत त्यांनी भागवत यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
©️ *-अभिजीत राणे*
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)




Comments