top of page

उद्योगवाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक

dhadakkamgarunion0
13 minutes ago
1 min read

*[ ⏺️ पंचनामा ]*

▪️==================▪️

*उद्योगवाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक*

● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून चाकण परिसरातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी २ हजार ३२० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. नागरी समस्यांमुळे कंपन्यांच्या स्थलांतराची चर्चा असताना, ४९ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसोबत हे करार करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे उत्पादनक्षमता वाढण्यासोबतच हजारो नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. उद्योगांना वेळेत जमीन व आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्याचे निर्देश त्यांनी उद्योग विभाग आणि एमआयडीसीला दिले आहेत. ‘एमएसएमई’ क्षेत्राला राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ मानत, उद्योगांच्या अचूक आढाव्यासाठी ‘एमएसएमई सेन्सस’ राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. याशिवाय, जुन्या औद्योगिक वसाहतींचे आधुनिकीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातून ‘औद्योगिक नगरी’ ही नवी संकल्पना सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. या दूरदृष्टीमुळे पुणे परिसरातील औद्योगिक परिसंस्थेला मोठे बळ मिळून महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन अधिक सक्षम होईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.

©️ *-अभिजीत राणे*

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page