राहुल गांधींच्या ‘लाल संविधाना’वरून मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसवर घणाघात
*[ ⏺️ पंचनामा ]*
▪️==================▪️
*राहुल गांधींच्या ‘लाल संविधाना’वरून मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसवर घणाघात*
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या राजकारणावर थेट प्रहार करत आगामी राजकीय लढाई फेक नरेटिव्हविरुद्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांच्या हातातील ‘लाल संविधाना’वरून टीका करताना फडणवीस म्हणाले की, संविधानाच्या नावाखाली माओवादी विचारसरणीचा प्रसार करून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. संविधानाचा दुरुपयोग करणाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश २०२७ पर्यंत विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना, महाराष्ट्राला २०३० पर्यंत ‘तीन ट्रिलियन डॉलर’ची अर्थव्यवस्था बनवण्याचा ठाम संकल्प फडणवीस यांनी मांडला. इतिहासातील सत्य मांडताना अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या पराक्रमाला योग्य स्थान मोदी सरकारने मिळवून दिले असून, त्यामुळे विरोधकांचा खोटा प्रचार मोडीत निघाल्याचे त्यांनी नमूद केले. कुंभमेळ्यातील पारदर्शक कारभारावर बोट ठेवत, विरोधकांच्या खोट्या प्रचाराला ठोस उत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.
©️ *-अभिजीत राणे*
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)




Comments