विकासप्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक
*[ ⏺️ पंचनामा ]*
▪️==================▪️
*विकासप्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक*
● राज्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला थेट व कडक संदेश दिला आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आढावा बैठकीत त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका त्यांच्या परिणामकारक कार्यपद्धतीची प्रचिती देते. प्रकल्पांमधील अनावश्यक विलंब आणि दिरंगाई कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असे ठणकावून सांगत त्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना त्यांची जबाबदारी स्पष्टपणे अधोरेखित केली. प्रकल्प केवळ कागदावर किंवा नियोजनात न राहता प्रत्यक्ष जमिनीवर वेळेत पूर्ण झाले पाहिजेत, हा मुख्यमंत्र्यांचा सुरुवातीपासूनच मुख्य आग्रह राहिला आहे. निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देताना त्यांनी प्रगतीबाबत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचा थेट इशारा दिला. यातून त्यांची प्रशासनावरील पकड आणि विकासाप्रती असलेली बांधिलकी स्पष्ट दिसते. कामाचा दर्जा, पारदर्शकता आणि नियोजित वेळ या त्रिसूत्रीवर भर देणारे फडणवीस यांचे हे नेतृत्व प्रशासनाला अधिक गतिमान व उत्तरदायी बनवणारे ठरत आहे. विकासप्रकल्पांना गती देऊन राज्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांचा हा निर्धार संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला नव्या ऊर्जेने काम करण्यास भाग पाडणारा आहे.
©️ *-अभिजीत राणे*
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)




Comments