समाजात तेढ निर्माण होऊ देणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ग्वाही
- dhadakkamgarunion0
- Sep 5
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
समाजात तेढ निर्माण होऊ देणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ग्वाही
● राज्यात सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. कोणत्याही परिस्थितीत दोन समाजांना एकमेकांसमोर उभे करून त्यांच्यात संघर्ष निर्माण होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत मुख्यमंत्र्यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, राजकारण महत्त्वाचे आहे, परंतु समाजा-समाजात तेढ निर्माण करून राजकारण करणे हे आमच्या तत्वांमध्ये बसत नाही. एका समाजाला संतुष्ट करण्यासाठी दुसऱ्या समाजाला असंतुष्ट करून त्यांच्यात भांडणे लावणे हे चुकीचे आहे. सर्वांना सोबत घेऊन राज्याचा विकास करणे हेच सरकारचे ध्येय आहे. सामाजिक एकोप्यामुळेच राज्याचा खऱ्या अर्थाने विकास होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासारख्या मुद्द्यांवर समाजात विविध मतप्रवाह आहेत. परंतु, सरकार कोणत्याही एका समाजावर अन्याय करणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. कायदेशीर चौकटीत राहूनच सर्व प्रश्न सोडवले जातील, असे त्यांनी सांगितले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments