top of page

सक्तीच्या धर्मांतराच्या वाढत्या घटनांना चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे कठोर पाऊल

  • dhadakkamgarunion0
  • 12 hours ago
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

सक्तीच्या धर्मांतराच्या वाढत्या घटनांना चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे कठोर पाऊल

● महाराष्ट्रात सक्तीने आणि प्रलोभने दाखवून केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांना पूर्णपणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत 'धर्मांतर विरोधी' विधेयकाच्या मसुद्याला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता राज्यात छुप्या प्रलोभनांना किंवा जबरदस्तीला कायद्याचा जबरदस्त लगाम बसणार असून, अशा कृत्यात सहभागी असणाऱ्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्याच्या सुरक्षेच्या आणि सामाजिक संतुलनाच्या दृष्टीने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन तरतुदीनुसार, हे विधेयक आता तातडीने विधानसभेत मांडले जाणार आहे. याचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर सक्तीने धर्मांतर करणाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून राज्यात लव्ह जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिकांनी याविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी गांभीर्याने घेत, मध्य प्रदेश आणि गुजरातपेक्षाही अधिक प्रभावी आणि कठोर कायदा तयार करण्याचे निर्देश दिले होते.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page