संतशक्तीच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री फडणवीसांचा परिवर्तनाचा संकल्प!
- dhadakkamgarunion0
- Aug 8
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
संतशक्तीच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री फडणवीसांचा परिवर्तनाचा संकल्प!
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगर येथे 'श्री संत सद्गुरु योगिराज गंगागिरीजी महाराज १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह'मध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी भगवंताच्या नामस्मरणात रमत फुगडीचा आनंद लुटला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'अखंड हरिनाम सप्ताहा'निमित्त आयोजित कृषी महोत्सवाची नोंद 'इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये झाल्याचे प्रमाणपत्र प. पू. ह. भ. प. रामगिरी महाराज यांना प्रदान केले. हरिनाम सप्ताहाच्या अनुशासनबद्ध आयोजनाची प्रशंसा करत त्यांनी नमूद केले की, याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठीही विचार होऊ शकतो. सरला बेटाच्या विकास आराखड्यास लवकरच मान्यता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शनि देवगाव बंधारा निश्चितपणे उभारण्यात येईल, असा शब्दही दिला. सरला बेट येथे भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची कामे शासन स्तरावर सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज, प. पू. ह. भ. प. रामगिरी महाराज आणि उपस्थित भक्तशक्तीचा आशीर्वाद घेत, दरवर्षी या सप्ताहात सहभागी होण्याचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments