संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील २२ वनमजुरांना कायमस्वरुपी दर्जा मिळाल्यासंबंधी धडक कामगार युनियनची पुढाकार भेट
- dhadakkamgarunion0
- Sep 12
- 1 min read
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनिता पाटील यांची आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाने ‘धडक’चे सभासद असलेल्या २२ वन मजुरांना कायमस्वरुपी दर्जा देण्याचे जे आदेश दिले त्याबाबतीत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी भेट घेतली. ही ऐतिहासिक लढाई धडक कामगार युनियनच्या माध्यमातून, कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर धडक वनविभाग प्रमुख जॉनी वायके यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाली. मागील 12 वर्षांपासून न्यायालयात सातत्याने लढा देत असलेल्या जॉनी वायके यांच्या प्रयत्नांना यश आले. यावेळी अनिता पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर पुढील कारवाई करण्यात येईल असे यावेळी त्यांनी आश्वासन युनियन ला दिले. यावेळी धडक वन विभाग प्रमुख जॉनी वायके, भगवान तांदळकर व दक्षिण विभागाचे विभागीय वनअधिकारी किरण पाटील, उत्तर विभागाचे विभागीय वनअधिकारी प्रदीप पाटील, जे सी एफ सुधिर सोनवले, आरएफओ एलएसपी शिंदे आदी उपस्थित होते.



















Comments