शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे ध्येय
- dhadakkamgarunion0
- Mar 23
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे ध्येय
● रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे हे केवळ एक पाण्याचे स्त्रोत नसून ते मानवी हक्कांच्या संघर्षाचे आणि सामाजिक समतेचे जिवंत प्रतीक आहे. या पवित्र भूमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चवदार तळे सुशोभीकरण प्रकल्पाची पायाभरणी केली. यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले की, समाजात असलेली अस्पृश्यता आणि कोणत्याही प्रकारची विषमता हा सर्वात मोठा अपराध आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा विचार हाच खऱ्या अर्थाने राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे सरकार हे शोषित आणि वंचितांचे सरकार आहे. केवळ स्मारके उभारणे हा उद्देश नसून, बाबासाहेबांच्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या मंत्राचा अवलंब करून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. अस्पृश्यतेचा कलंक पुसून काढण्यासाठी सामाजिक समरसतेचा विचार घराघरात पोहोचवणे हीच खरी या स्मारकाची फलश्रुती ठरेल.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)




Comments