top of page

शरद पवार यांनी केले मुख्यमंत्री फडणवीसांचे मुक्तकंठाने कौतुक

  • dhadakkamgarunion0
  • Jul 23
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

शरद पवार यांनी केले मुख्यमंत्री फडणवीसांचे मुक्तकंठाने कौतुक

● शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'महाराष्ट्र नायक' या कॉफी टेबल बुकमध्ये शरद पवार यांनी फडणवीसांच्या कार्याची प्रशंसा करणारा एक लेख लिहिला आहे. आपल्या लेखात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामाच्या वेगाची आणि अथक परिश्रमाची विशेष दखल घेतली आहे. ‘देवेंद्र यांच्या कामाची गती अफाट आहे. त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत, असा प्रश्न मलाही पडतो,’ असे पवार यांनी म्हटले आहे. क्रियाशील राहण्यासाठी शरीर शिडशिडीत असावे असे मानले जाते, पण आमच्या दोघांच्या बाबतीत, स्थूलपणा कधीही कार्यक्षमतेत अडथळा ठरला नाही, असा मिश्किल उल्लेखही त्यांनी केला. फडणवीसांचा कामाचा झपाटा आणि उरक पाहिल्यावर त्यांना स्वतःच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आठवतो, असेही पवारांनी नमूद केले. देवेंद्र फडणवीसांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले असले, तरी वडिलांच्या अकाली निधनानंतर सावरून, उभे राहून नेटाने पुढे जाणे आव्हानात्मक होते. त्यामुळे आजवरच्या त्यांच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय केवळ त्यांनाच जाते, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page