विरोधकांच्या राजकारणाला मुख्यमंत्री फडणवीसांकडून थेट कृतीने चोख प्रत्युत्तर
*[ ⏺️ पंचनामा ]*
▪️==================▪️
*विरोधकांच्या राजकारणाला मुख्यमंत्री फडणवीसांकडून थेट कृतीने चोख प्रत्युत्तर*
● एमपीएससीच्या कथित पेपरफुटी प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत संवेदनशील आणि निर्णायक भूमिका घेतली आहे. विरोधकांकडून या संवेदनशील मुद्द्याचे राजकारण केले जात असताना, मुख्यमंत्र्यांनी थेट कृतीवर भर दिला. त्यांनी एमपीएससीच्या विद्यार्थी शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्या अडचणी व मागण्या प्रत्यक्ष समजून घेतल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षेतील भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी फडणवीस सरकारने 'सारथी' व 'बार्टी' यांसारख्या विविध कल्याणकारी योजनांद्वारे एमपीएससी तसेच यूपीएससीची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना मोठ्या सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीएससी ही स्वायत्त संस्था असली, तरी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत परीक्षा नियंत्रकासह सहा जणांना अटक केली आहे. गैरप्रकार करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देऊन फडणवीस प्रशासनाने कठोर कारवाईचा वस्तुपाठ घालून दिला आहे. विरोधकांच्या केवळ राजकीय आरोपांना उत्तर देण्यापेक्षा फडणवीस यांनी प्रत्यक्ष पारदर्शक पावले उचलून विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे पसंत केले आहे.
©️ *-अभिजीत राणे*
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)




Comments