top of page

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रत्यक्ष कृतीवर भर

dhadakkamgarunion0
10 minutes ago
1 min read

*[ ⏺️ पंचनामा ]*

▪️==================▪️

*मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रत्यक्ष कृतीवर भर*

● मराठा आरक्षणाच्या संवेदनशील मुद्यावर राज्य सरकार अत्यंत सकारात्मक असून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. याप्रश्नी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचा त्यांचा निर्धार या भूमिकेतून ठळकपणे समोर येतो. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात विविध पातळीवर सविस्तर चर्चा पूर्ण झाली असून, कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही वेगाने सुरू आहे. समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन पातळीवर जे जे शक्य आहे, ते सर्व प्रयत्न प्रामाणिकपणे केले जातील, अशी ठोस ग्वाही त्यांनी जनतेला दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजातील असंतोष कमी होऊन एक विश्वासार्ह वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होत आहे. कोणत्याही परिस्थितीत कायद्याच्या चौकटीत टिकणारे आणि सर्वसमावेशक आरक्षण देणे हेच शासनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी वारंवार अधोरेखित केले आहे. न्यायालयीन प्रक्रिया, मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि इतर तांत्रिक बाबींवर स्वतः बारीक लक्ष ठेवून फडणवीस मार्ग काढत आहेत. सर्व घटकांना सोबत घेत सामाजिक सलोखा कायम राखण्याचे नेतृत्वकौशल्य यातून दिसून येते. मराठा समाजाला हक्क मिळवून देण्याच्या या संवेदनशील लढ्यात फडणवीस यांचे नेतृत्व अत्यंत निर्णायक व आश्वासक ठरणार आहे.

©️ *-अभिजीत राणे*

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page