विरोधकांचा सुपडा साफ होणार;रवींद्र चव्हाणांना ठाम विश्वास
- dhadakkamgarunion0
- Dec 28, 2025
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
विरोधकांचा सुपडा साफ होणार;रवींद्र चव्हाणांना ठाम विश्वास
● भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुकांबाबत मोठे विधान केले आहे. राज्यातील सर्व महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महायुतीचाच झेंडा फडकेल आणि सर्व ठिकाणी महायुतीचेच महापौर विराजमान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले की, मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये महायुती म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जो विश्वास दाखवला आहे, तोच कल महापालिका निवडणुकीतही दिसून येईल. महाविकास आघाडीला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागेल, असेही चव्हाण म्हणाले. त्यांच्या मते, विरोधक केवळ सोशल मीडियावर सक्रिय असून जमिनीवर त्यांचे अस्तित्व उरलेले नाही. नगरपरिषद निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांनी मिळवलेले यश हे केवळ ट्रेलर असून पूर्ण चित्र महापालिका निवडणुकीत स्पष्ट होईल. महायुतीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सरकारी योजनांची माहिती पोहोचवत असल्यामुळे जनतेचा पाठिंबा वाढत आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)







Comments