top of page

विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा फुलस्टॉप

  • dhadakkamgarunion0
  • Jan 22
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा फुलस्टॉप

● मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर महापौरपदावरून सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मुंबईत परतल्यानंतर सर्व घटक पक्षांशी चर्चा करून महापौरपदाचा अंतिम निर्णय घेतला जाईल. विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेना आणि भाजपा यांच्यात महापौरपदावरून कोणत्याही प्रकारची खेचाखेच सुरू नाही. आम्ही निवडणुकीपूर्वीच एकत्र होतो आणि निकालानंतरही आमची युती अधिक भक्कम झाली आहे. काही लोक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेचा समाचार घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यांना जनतेने नाकारले आहे, तेच आता महायुतीमध्ये फूट पडल्याच्या वावड्या उठवत आहेत. मात्र, आमचे सरकार 'ट्रिपल इंजिन' वेगाने धावत असून मुंबईचा पुढील प्रथम नागरिक हा महायुतीचाच असेल, यात शंका नाही..

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page