विद्यादीप बालसुधारगृह प्रकरणातील दोषींना निलंबित करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन
- dhadakkamgarunion0
- Jul 9
- 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
विद्यादीप बालसुधारगृह प्रकरणातील दोषींना निलंबित करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन
● छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यादीप बालसुधारगृहातील धक्कादायक प्रकारासंबंधी जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात येईल. तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समितीने चौकशी केल्यानंतर संस्थेच्या अधीक्षक आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर संस्थेला मुदतवाढ न देता संस्थेची मान्यता रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत दिली. दरम्यान, तीन महिला पोलिसांची समिती गुरुवारी अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल आल्यानंतर त्यात जे दोषी असतील त्या सर्वांना निलंबित करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)







Comments