top of page

विकासकामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे पाऊल

dhadakkamgarunion0
12 minutes ago
1 min read

*[ ⏺️ पंचनामा ]*

▪️==================▪️

*विकासकामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे पाऊल*

● राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र लँड बँक’ या एकात्मिक डिजिटल प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. शासकीय जमिनींची माहिती एकाच छताखाली आणून विकासकामांना नवी दिशा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. सध्या विविध स्तरांवर विखुरलेल्या शासकीय जमिनींच्या माहितीमुळे निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब दूर करणे, हा या प्रणालीमागील मुख्यमंत्र्यांचा उद्देश आहे. या प्रणालीमुळे जमीन शोध, प्रत्यक्ष पडताळणी आणि वाटप प्रक्रियेत सुलभता येऊन कामकाजात पारदर्शकता वाढेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उपलब्ध जमिनीचा योग्य विनियोग आणि विविध विभागांच्या गरजेनुसार जलद मॅपिंग करण्यासाठी ही व्यवस्था अत्यंत उपयुक्त ठरेल. ई-फेरफार अभिलेख पडताळणी, प्रत्यक्ष स्थळ पाहणी, जीआयएस आधारित भौगोलिक विश्लेषण आणि सुरक्षित डिजिटल रिपॉझिटरी याद्वारे शासकीय जमिनींचे संकलन केले जाणार आहे. तालुका पातळीवर तहसीलदारांमार्फत नोंदी अद्ययावत ठेवल्या जातील. गाव, तालुका, जिल्हा आणि विभागनिहाय प्रगती अहवालाद्वारे थेट आढावा घेणे शक्य होणार असून, फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यातील विकास प्रकल्पांना मोठी चालना मिळणार आहे.

©️ *-अभिजीत राणे*

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page