राष्ट्रप्रेमी जनता धडा शिकवणार; मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ठणकावले
- dhadakkamgarunion0
- 16 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
राष्ट्रप्रेमी जनता धडा शिकवणार; मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ठणकावले
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. फडणवीस यांनी ठाकरेंच्या सत्तेच्या हव्यासावर आणि बदललेल्या राजकीय भूमिकेवर कडक शब्दांत प्रहार केला आहे. त्यांनी म्हटले की, केवळ सत्तेसाठी आणि काही विशिष्ट वर्गाचे लांगूलचालन करण्यासाठी ठाकरेंनी आपली विचारधारा बाजूला सारली आहे, ज्याची किंमत त्यांना निवडणुकीत मोजावी लागेल. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यांच्यासोबत आयुष्यभर संघर्ष केला, त्यांच्याच चरणी ठाकरेंनी आता लोटांगण घातले आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी स्वतःची मूळ विचारधारा विसरणाऱ्या नेत्यांना जनता कधीच माफ करत नाही. फडणवीस म्हणाले की, 'महाराष्ट्र आणि देशातील राष्ट्रप्रेमी जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहे. जनतेला हे कृत्य अजिबात आवडलेले नाही.' सत्तेच्या मोहापायी घेतलेले हे निर्णय उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या महागात पडतील आणि त्याचे प्रचंड नुकसान त्यांना येणाऱ्या काळात सहन करावे लागेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)






Comments