महायुतीचा धर्म पाळण्याचे रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- dhadakkamgarunion0
- 16 minutes ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ]
▪️==================▪️
महायुतीचा धर्म पाळण्याचे रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
● भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना असे स्पष्ट केले की, युतीमध्ये लढताना काही ठिकाणी तडजोड करावी लागते. शिवसेना-भाजपा युती आहे, त्यामुळे ज्या जागा आपल्या वाट्याला आल्या आहेत, तिथे पूर्ण ताकदीने लढा आणि जिथे मित्रपक्ष लढत आहेत तिथे त्यांना सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. कार्यकर्त्यांनी आहे त्या जागांवर समाधान मानून केवळ विजयाचा ध्यास धरावा, अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली आहे. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, वैयक्तिक इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून पक्षाचे ध्येय आणि युतीची शक्ती वाढवण्यासाठी काम करणे ही काळाची गरज आहे. रवींद्र चव्हाण यांनी दिलेली ही सूचना कार्यकर्ते अत्यंत सकारात्मकतेने स्वीकारतील. कारण कार्यकर्त्यांचा त्यांच्या नेतृत्वावर गाढा विश्वास आहे. चव्हाणांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम दूर झाला आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)






Comments